ETV Bharat / sitara

‘नवे लक्ष्य’ची टीम पुन्हा मुंबईत दाखल,नव्या वेळेत येणार प्रेक्षकांच्या भेटीस! - ‘नवे लक्ष्य’ मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर

महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या रुपात स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झाली होती आणि त्याला प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद मिळत होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात चित्रीकरणांवर बंदी आणली आणि अनेक मालिका यात भरडल्या गेल्या. परंतु आता मुंबईत चित्रीकरणाची परवानगी मिळाली असून ‘नवे लक्ष्य’ ची टीम पुन्हा एकदा एका नवीन वेळेवर गुन्ह्यांचा शोध घेताना दिसणार आहे.

shooting-of-nave-lakshya
महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’
author img

By

Published : Jun 29, 2021, 7:19 PM IST

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या रुपात स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झाली होती आणि त्याला प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद मिळत होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात चित्रीकरणांवर बंदी आणली आणि अनेक मालिका यात भरडल्या गेल्या. परंतु आता मुंबईत चित्रीकरणाची परवानगी मिळाली असून ‘नवे लक्ष्य’ ची टीम पुन्हा एकदा एका नवीन वेळेवर गुन्ह्यांचा शोध घेताना दिसणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं. महाराष्ट्राच्या या खऱ्या सुपरहिरोंचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रितीने उकल करून सांगणारी ‘नवे लक्ष्य’ ही कथामालिका आहे.

shooting-of-nave-lakshya
‘नवे लक्ष्य’ची टीम पुन्हा मुंबईत दाखल

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘नवे लक्ष्य’ या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शन्सने केली आहे. या मालिकेच्या नव्या वेळेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, “महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणूस आणि त्याचं माणूसपण अधोरेखित करणारं असं हे ‘नवे लक्ष्य’ आहे. ‘नवे लक्ष्य’ आता ४ जुलैपासून दर रविवारी रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट आपण सहकुटुंब पाहायलाच हवी.”

एसीपी अर्जुन करंदीकर, पीआय विक्रांत गायकवाड, पीआय मोक्षदा मोहिते, हेड कॉन्टेबल आप्पा मालवणकर आणि पीएसआय जय दिक्षित या जिगरबाज पोलिसांची टीम नव्या साहसी गोष्टींसह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेचे नवे एपिसोड्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ४ जुलैपासून दर रविवारी रात्री ९ वाजता ‘नवे लक्ष्य’ची टीम गुन्हेगारांच्या नाकी नऊ आणणार आहे.

‘नवे लक्ष्य’ मालिका नवीन वेळेनुसार ४ जुलैपासून दर रविवारी रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होईल.

हेही वाचा - दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा करणारा शाहरुखसोबत बॉलिवूड पदार्पण

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.