वॉशिंग्टन - सुपर बाऊल ओव्हरच्या कार्यक्रमात एन्जॉय करताना अमेरिकन पॉप गायिका लेडी गागा आपल्या प्रियकरासह दिसली. मियामी येथील हार्ड रॉक स्टेडियममध्ये सुपर बाऊल लीव शोमध्ये ती प्रियकरासोबत आली होती.
मिशेल पोलन्स्की असे लेडी गागाच्या या नव्या मित्राचे नाव आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या पारकर ग्रुपचा तो सीईओ आहे. या शोमध्ये मिशेल आणि लेडी गागा चुंबन घेताना दिसले.
- View this post on Instagram
We had so much fun in Miami. Love to all my little monsters and fans, you’re the best! ❤️
">
गायिका लेडी गागाने मिशेलसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहिरपणे कबुल केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन या बातमीला पुष्टी दिली. मियामीमध्ये भरपूर मजा मस्ती केल्याचे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
लेडी गागा आणि ख्रिस्तियन कॅरिनो याचे प्रेम प्रकरण खूप चर्चेतहोते. मात्र गेल्या वर्षी ब्रेकअप होऊन दोघे वेगळे झाले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपले नाते तुटल्याचे गागाने सांगितले होते. ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तिने एंगेजमेंट रिंग घातली नव्हती. तेव्हापासून लेडी गागा आणि ख्रिस्तियन कॅरिनोच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली होती. अखेर तिच्या जीवनात नव्या मित्राने स्थान मिळवले आहे.