ETV Bharat / sitara

'समांतर- २'मध्ये पहायला मिळणार 'या' दोन अभिनेत्यांची जुगलबंदी - Sameer Vidwans latest news

समांतर मालिकेचे दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर यावेळी निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदारसुद्धा हजर होते.या सर्वांनी दुसरे पर्व लवकरच रिलीज करणार असल्याचे जाहीर केले आहे.

'Samantar-2'
समांतर
author img

By

Published : Dec 12, 2020, 7:49 PM IST

मुंबई - ‘एमएक्स प्लेयर' या ओ टी टी प्लॅटफॉर्म वरून 'समांतर' ही मालिका प्रसारित झाली होती. मालिकेच्या पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत. सुहास शिरवळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असल्याने ती रेसिकांना खूप आवडली. उत्तम कथेबरोबरच सकस अभिनय, तेवढेच ताकदीचे दिग्दर्शन आणि खिळवून ठेवणारी हाताळणी यामुळे वेब सिरीजच्या पहिल्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या पर्वतही आम्ही तेवढीच दर्जेदार हातळणी दिली असून काही नवीन पैलू त्यात दाखल केले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या दुसऱ्या पर्वलासुद्धा तेवढेच डोक्यावर घेतील अशी अपेक्षा या टीमने व्यक्त केली आहे.

काय होती पहिल्या भागाची कथा..?

सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो.

टीव्हीवर गाजलेले दोन्ही कृष्ण पहिल्यांदाच वेब सिरिजच्या निमित्ताने एकत्र

जगभरातील प्रेक्षकांना समांतर या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज भूमिकेत आहेत. स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्याच्या चाहत्यांना ती खूप आवडली होती. या सर्वच कारणांनी या वेब सिरीजबद्दलची रसिकांची प्रतीक्षा ताणली गेली आहे.

स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या ‘कृष्ण’ (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या दोघांची मालिका म्हणूनही ‘समांतर’बद्दल रसिकांमध्ये कुतूहल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.