ETV Bharat / sitara

‘महाराणी’ म्हणजे ‘अंगुठा-छाप’ गृहिणी ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

author img

By

Published : May 20, 2021, 10:37 PM IST

सुभाष कपूर यांची निर्मिती असलेल्‍या ‘महाराणी’ चे दिग्दर्शन करन शर्मा करीत आहेत. या शोमध्‍ये सोहम शाह, अमित सियाल व विनीत कुमार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘महाराणी’ च्या भूमिकेत हुमा कुरेशी दिसणार असून या भूमिकेसाठी हुमा कुरेशीने एक वेगळा लूक परिधान केला आहे.

huma-quresh
हुमा कुरेशी

सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर वास्तविक जीवनातील कथा सांगण्याचा दौर सुरु आहे. येथे खऱ्या आयुष्यातील अनेक कथा थोड्याफार फरकाने सांगितल्या जातात. राजकारण आणि गुन्हेगारी विश्वातील कथांना खूप डिमांड आहे आणि सोनी लिव्‍ह वर येणारी ‘महाराणी’ ही वेब सिरीज वरील डिमांडमध्ये चपखलपणे बसते. बिहारमध्ये एका मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खुर्ची सोडावी लागणार होती. त्यांच्या पार्टीत अनेक निष्ठावंत असले तरी खुर्चीच्या मोहापायी कोणीही दगा देऊ शकला असता म्हणून त्यांनी आपल्या ‘अंगुठा-छाप’ अर्धांगिनीलाच मुख्यमंत्री बनविले. साहजिकच पूर्ण कारभार तेच हाकत होते, घरून किंवा जेलमधून. अशाच प्रकारचे कथानक ‘महाराणी’ मधून बघायला मिळेल हे त्याची चित्रझलक पाहून समजते.

Huma Qureshi in the role of 'Maharani'
‘महाराणी’ च्या भूमिकेत हुमा कुरेशी

‘महाराणी’ च्या भूमिकेत हुमा कुरेशी दिसणार असून या भूमिकेसाठी हुमा कुरेशीने एक वेगळा लूक परिधान केला आहे. ज्याची झलक निर्मात्यांनी सादर केलेल्या चित्रफलकावरून मिळते. हुमाचा मुख्यमंत्री लूक लक्षवेधक व आकर्षकरित्या डिझाइन करण्‍यात आला आहे. सीएमच्‍या लुकसाठी या अभिनेत्रीने गडद रंगाच्‍या साडीसोबत शाल घेतली आहे. हा लूक तिच्‍या भूमिकेसाठी आवश्‍यक असलेल्‍या व्‍यक्तिमत्त्वाला उभारून आणतो. डोळ्यांमध्‍ये काजळ आणि कपाळावर लाल बिंदी असलेल्‍या लूकमध्‍ये हुमा दाखवून देते की ती येथे टिकून राहणार आहे.

निरक्षर असूनही प्रत्‍येक गोष्‍टीचे बारकाईने निरीक्षण करण्‍यापर्यंत बुद्धीकौशल्‍य असलेली, तसेच प्रामाणिक असण्‍यासोबत कुटुंबावर घोंघावणा-या धोक्‍याबाबत लढाऊ वृत्ती असलेली रानी भारती लक्षवेधक विरोधाभास असलेली महिला आहे. तिच्‍या पतीने घेतलेल्‍या निर्णयानंतर तिच्‍या जीवनात अडथळे निर्माण होतात. गायींचे दूध काढणे, शेण थापणे ते सर्व विषमतांवर मात करीत कुटुंबाचे संरक्षण करणे अशा अनेक गोष्‍टी तिला एकाचवेळी कराव्‍या लागतात. भविष्‍यात तिच्‍याबाबतीत काय घडणार आहे, हे एक रहस्‍य आहे, ज्‍याचा उलगडा लवकरच होईल.

Huma Qureshi in the role of 'Maharani'
‘महाराणी’ च्या भूमिकेत हुमा कुरेशी

मुख्‍यमंत्री लुकबाबत सांगताना हुमा कुरेशी म्‍हणाली, ''या सिरीजमध्ये मी रानी भारतीची बहुआयामी भूमिका साकारत आहे. ‘महाराणी’ च्या ट्रेलरला खूपच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि मला खात्री आहे की या शोच्‍या माध्यमातून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होईल. या भूमिकेमध्‍ये विविध छटा सामावलेल्‍या आहेत म्‍हणूनच ही भूमिका साकारताना खूपच समाधानकारक वाटत आहे. भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी आम्‍ही विविध लूक्सचा वापर करून पाहिला आणि या लूकवर शिक्कामोर्तब केले. यामुळे तिच्‍या जीवनातील विविध टप्‍प्‍यांना सादर करण्‍यामध्‍ये मला नक्कीच मदत झाली. ही सिरीज लवकरच सुरू होण्‍यासाठी मी खूपच उत्‍सुक आहे.”

सुभाष कपूर यांची निर्मिती असलेल्‍या ‘महाराणी’ चे दिग्दर्शन करन शर्मा करीत आहेत. या शोमध्‍ये सोहम शाह, अमित सियाल व विनीत कुमार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नरेन कुमार व डिम्‍पल खरबंदा यांची निर्मिती असलेली 'महारानी' ही एक काल्‍पनिक सिरीज आहे, जी २८ मे २०२१ रोजी सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - सोनालीने 'दुबई'च्या 'गोजिरवाण्या घरात' मांडला सुखाचा संसार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.