मुंबई : कोट्यवधी प्रेक्षकांच्या आवडीचा रियालिटी शो असलेल्या बिग बॉसच्या 15 व्या सीझनला सुरूवात झाली आहे. चाहत्यांची बारीक नजर असलेल्या बिग बॉसच्या घरात सुरूवातीलाच दोन स्टार स्पर्धकांमध्ये चांगलेच भांडण झाले आहे. या भांडणात बिग बॉसच्या घरातील सामानाचीही मोडतोड झाली आहे.
जय भानुशाली आणि प्रतिक सहजपालमध्ये जोरदार भांडण झाले. दोघांच्या भांडणात बिग बॉसच्या घराचीही मोडतोड झाली आहे. दरम्यान, दोघांचे भांडण पाहून घरातील इतर सदस्यही स्तब्ध झाले.
वनवासींना मिळणार घरात जाण्याची संधी
15 व्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घराचे दोन भाग करण्यात आले आहेत. एक आहे मुख्य घराचा भाग आणि दुसरा आहे घराबाहेरील जंगलाचा भाग. घरामध्ये शमिता, प्रतिक आणि निशांत यांना स्थान मिळाले आहेत. तर इतर सदस्य हे घराबाहेरील जंगलात आहेत. जंगलातील वनवासींना दिलेला टास्क पूर्ण केल्यास घरात राहण्याची संधी मिळणार आहे. तर घरातील सदस्यांना त्यांचे टास्क पूर्ण न होऊ देण्याचे काम दिलेले आहे.
नेमके काय झाले?
एका टास्कदरम्यान प्रतिकचा जयसोबत वाद झाला, त्यानंतर तो घराबाहेर आला आणि त्याने वनवासींसोबत वाद घातला. या दरम्यान त्याने करण कुंद्रा, उमर रियाज यांच्याशीही वाद घातला आणि पुन्हा त्याचा जयसोबत वाद सुरू झाला. यावेळी प्रतिकने आपली कॉलर पकडल्याचे जयने म्हटले. यानंतर प्रतिक रागाच्या भरात पुढे निघाल्यानंतर निशांतने त्याला पकडले. यावेळी प्रतिकने रागाच्या भरात कोपर मारल्याने त्याच्या मागे असलेल्या काचेच्या दरवाजाला तडा गेला आणि तो तुटला.
हेही वाचा - बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तानाशाही आणि लढाई!