ETV Bharat / sitara

'काशीबाई बाजीराव बल्लाळ' मालिकेत छोट्‌या काशीबाईची भूमिका साकारतेय ९ वर्षीय आरोही पटेल!

author img

By

Published : Oct 20, 2021, 6:43 AM IST

विविधांगी विषयांवरील मालिकांसाठी झी टीव्ही एक ट्रेंड सेटर असून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर महत्त्वपूर्ण परिणाम घडवून आणलेल्या भारतातील काही मोठमोठ्‌या नेते आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या आयुष्याचा प्रेरणादायी लेखाजोखा मांडला आहे. जोधा अकबर आणि झांसी की रानी यांच्या आयुष्याचा प्रवास प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर झी टीव्ही आता 2021 सालातील सर्वांत मोठी ऐतिहासिक भव्य मालिका 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' घेऊन येत आहे.

काशीबाई बाजीराव बल्लाळ
Kashibai Bajirao Ballal

मुंबई - सध्या ऐतिहासिक विषयांवरील मालिकांचे पेव फुटले आहे. प्रेक्षकही ऐतिहासिक मालिकांना प्रचंड प्रतिसाद देताना दिसताहेत. या परंपरेला अनुसरून झी टीव्ही वाहिनी लवकरच छोट्या पडद्यावर घेऊन येत आहे. अतिशय लाडात वाढलेली एक छोटी राजकन्या, मोठी होऊन एक चतुर प्रशासक आणि मराठा साम्राज्याची अभिमान बनते, अशा राजकन्येची कधीही न पाहिलेली कथा. विविधांगी विषयांवरील मालिकांसाठी झी टीव्ही एक ट्रेंड सेटर असून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर महत्त्वपूर्ण परिणाम घडवून आणलेल्या भारतातील काही मोठमोठ्‌या नेते आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या आयुष्याचा प्रेरणादायी लेखाजोखा मांडला आहे. जोधा अकबर आणि झांसी की रानी यांच्या आयुष्याचा प्रवास प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर झी टीव्ही आता 2021 सालातील सर्वांत मोठी ऐतिहासिक भव्य मालिका 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' घेऊन येत आहे.

या मालिकेतून महान मराठा साम्राज्य त्यांचा अभिमान आणि शौर्याची कथा काशीबाईच्या नजरेतून सांगण्यात येईल. मराठा साम्राज्यातील सर्वांत विशेष स्त्रियांपैकी एक असलेल्या ह्या स्त्रीची कथा यातून प्रस्तुत करण्यात येईल. ही कथा आहे एका लाडात वाढलेल्या छोट्‌या मुलीच्या प्रवासाची जी मोठी होऊन एक चतुर निर्णयकर्ती पेशवीणबाई बनते. बाजीराव मराठा साम्राज्य वाढवत असताना एका प्रशासकाच्या रूपात त्या गड सांभाळतात. ही एका साधारण मुलीची कथा आहे. एक तरुणी जिने तिच्या साम्राज्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि चतुर प्रशासन आणि लोकांचे नेतृत्व करण्याच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले.

या मालिकेमध्ये छोट्‌या काशीबाईच्या रूपात 9 वर्षीय आरोही पटेल पदार्पण करत आहे. आपल्या पहिल्याच मालिकेमध्ये एवढी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिरेखा आपल्याला साकारायला मिळत आहे. याबद्दल आरोही अतिशय उत्साहात आहे. तिचे व्यक्तिमत्त्व आणि निरागसता हे प्रेक्षकांचे मन नक्कीच जिंकेल. आरोही मराठा साम्राज्याबद्दल, त्यांचे वागणेबोलणे आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल दररोज नवीन गोष्टी शिकत आहे आणि तिच्या मते अप्रतिम मराठा साम्राज्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ह्या मालिकेचा निश्चितपणे फायदा होईल.

आपली व्यक्तिरेखा आणि मालिका काशीबाई बाजीराव बल्लाळबद्दल आरोही पटेल म्हणाली "आम्ही चित्रीकरण सुरू करण्याआधी मी दिग्दर्शक आणि अख्ख्या टीमसोबत रोज बसायचे आणि त्यांच्याकडून माझा परफॉर्मन्स अधिक खरा आणि नैसर्गिक बनावा यासाठी वागण्या-बोलण्याची तऱ्हा शिकायचे. आत्तापर्यंत मला हे कळले आहे, की वयाने लहान असलेल्या काशीबाईचे पुष्कळ लाड झाले होते. अगदी माझ्यासारखे. निर्मात्यांनी मी काशीबाईसारखीच दिसावे यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आहेत.”

ती पुढे म्हणाले, “ही माझी पहिलीच मालिका असून आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासामधील एक आयकॉनिक व्यक्तिरेखा साकारण्याबद्दल मी अतिशय उत्साहात आहे. ह्या मालिकेसाठी ऑडिशन देताना मला काशीबाईंबद्दल अधिक जाणून घ्यायला मिळाले आणि मी त्यांच्यामुळे लगेचच प्रेरित झाले. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आणखीनच उत्साहजनक बनले. सेटवर क्रिएटिव्ह टीम मला मराठा साम्राज्य आणि काशीबाईच्या प्रवासाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पैलूंशी ओळख करून देत आहे. त्यामुळे तयारी करायला मला मदत झाली. मला माझा लूक खूप आवडला आहे. मला आशा आहे प्रेक्षकांना माझ्या माध्यमातून काशीबाईंची कथा जाणून घेता येईल."

हेही वाचा - वन्‍यजीवाच्‍या नाट्यमय कथांना विनोदी ट्विस्‍ट देणारी रिअल-लाइफ ड्रामा सिरीज 'सेरेंगेटी २’!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.