ETV Bharat / sitara

देवा श्री गणेशा : अभिनेत्री भाग्यश्री मोटे साकारणार पार्वती

author img

By

Published : Aug 9, 2020, 3:19 PM IST

बाप्पाच्या या विशेष मालिकेमध्ये माता पार्वतीच्या रुपात दिसेल अभिनेत्री भाग्यश्री मोटे. भाग्यश्रीच्या लुकवरूनच मालिकेची भव्यता लक्षात येईल. भाग्यश्रीचा लूक डिझाईन केला आहे शिबाप्रिया सेन यांनी. ‘देवा श्री गणेशा’ मालिकेमधील माता पार्वतीचा लूक समोर आल्यानंतर गणपती बाप्पा कोण, साकारणार याची उत्सुकता आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे साकारणार पार्वती

मुंबई - गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचंच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून ही मालिका आपल्या भेटीला येईल. कोरोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे.

बाप्पाच्या या विशेष मालिकेमध्ये माता पार्वतीच्या रुपात दिसेल अभिनेत्री भाग्यश्री मोटे. भाग्यश्रीच्या लुकवरूनच मालिकेची भव्यता लक्षात येईल. भाग्यश्रीचा लूक डिझाईन केला आहे शिबाप्रिया सेन यांनी. ‘देवा श्री गणेशा’ मालिकेमधील माता पार्वतीचा लूक समोर आल्यानंतर गणपती बाप्पा कोण, साकारणार याची उत्सुकता आहे.

भाग्यश्री मोटे या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना म्हणाली, ‘देवयानीनंतर पुन्हा एकदा ‘देवा श्री गणेशा’ ही भव्यदिव्य मालिका साकारायला मिळते आहे, याचा प्रचंड आनंद आहे. पार्वतीच्या रुपात जेव्हा मी स्वत:ला पाहिलं, तेव्हा मी भारावून गेले होते. या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आलीय. माता पार्वतीची सौम्यता तिचा हवळेपणा आणि प्रसंगी समोर येणारं रौद्र रुप हे साकारायला मिळणं, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.’

२२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता सुरू होणाऱ्या स्टार प्रवाहच्या ‘देवा श्री गणेशा’ मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी बिगबजेट मालिका आकाराला येतेय. महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या स्वस्तिक प्रोडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. ही महामालिका साकारण्यासाठी स्टार प्रवाह आणि स्वस्तिक प्रोडक्शन्सची संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत करते आहे. उमरगाव येथे या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे.

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपण कधीही ऐकल्या आणि पाहिल्या नाहीत, त्या दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर, गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये, अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकीवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा? बाप्पा भालचंद्र कसा झाला? याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहीत नाही. ‘देवा श्री गणेशा’ या ११ भागांच्या विशेष मालिकेतून ११ ऐकलेल्या मात्र, त्याविषयी फारशी माहिती नसलेल्या बाप्पाच्या पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.