मराठी सिनेमात कथानकांचे वैविध्य नेहमीच पाहात आलो आहोत. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच वेगळे विषय हाताळताना दिसले आहे. याच परंपरेतील एक नवा चित्रपट येतोय त्याचे शीर्षक आहे 'कुलकर्णी चौकतला देशपांडे'. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
'कुलकर्णी चौकतला देशपांडे' या चित्रपटात सई ताम्हणकर, राजेश श्रृंगारपुरे आणि निखील रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका बिनधास्त, निर्भीड भूकेत सई पुम्हा झळकली आहे. राजेशने रांगडा प्रियकर साकारलाय तर निखील रत्नपाऱखी त्याच्या नेहमीच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झालाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'कुलकर्णी चौकतला देशपांडे' या चित्रपटाची निर्मिती स्मिता विनय गानू यांची असून गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलंय. येत्या २२ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.