ETV Bharat / sitara

दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, फोटो शेअर करत दिली माहिती

author img

By

Published : Jun 3, 2020, 9:05 PM IST

पृथ्वीराज आपल्या ‘आदुजीविथाम’ या मल्ल्याळम सिनेमाच्या चित्रीकरणासाठी 58 क्रू मेंबर्ससोबत जॉर्डन येथे गेले होते. अशात अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे हे सर्वजण तेथे अडकले होते. 22 मे रोजी हे सर्व कोचीमध्ये दाखल झाले. यानंतर सर्वांनी एका हॉटेलमध्ये स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले.

Prithviraj Sukumaran tests negative
अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन

कोची - दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईन होते. जॉर्डन येथून एका चित्रपटाचे चित्रीकरण करुन परतल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सुकुमारन यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे.

मल्ल्याळम अभिनेता पृथ्वीराज यांनी सोशल मीडियावर आपला कोरोना चाचणी अहवाल शेअर केला आहे. मात्र, अहवाल निगेटिव्ह आला असला तरी चौदा दिवस क्वारंटाईनमध्येच राहाणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहाण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पृथ्वीराज आपल्या ‘आदुजीविथाम’ या मल्ल्याळम सिनेमाच्या चित्रीकरणासाठी 58 क्रू मेंबर्ससोबत जॉर्डन येथे गेले होते. अशात अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे हे सर्व वादी रम येथे अडकले होते. 22 मे रोजी हे सर्व कोचीमध्ये दाखल झाले. यानंतर सर्वांनी एका हॉटेलमध्ये स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले. यादरम्यान हॉटेलमध्ये मिळालेल्या सुविधांसाठी पृथ्वीराजने स्टाफचे आभार मानले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.