ETV Bharat / sitara

शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस'ला तब्येतीसाठी शुभेच्छा, म्हणाले...

author img

By

Published : Aug 13, 2020, 4:47 PM IST

 ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी 61 वर्षीय संजुबाबाला आजारातून बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जुन्या आठवणी ताज्या करणारा एक फोटोही त्यांनी समाज माध्यमातून शेअर केला आहे.

संग्रहित- संजय दत्त व शुत्रघ्न सिन्हा
संग्रहित- संजय दत्त व शुत्रघ्न सिन्हा

मुंबई – अभिनेते, राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी संजय दत्त यांना तब्येत लवकर सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वैद्यकीय कारणांमुळे संजय दत्तने कामामधून विश्रांती घेतल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे.

  • Disturbing news! Healing prayers for our own @duttsanjay who is a fighter & as his wife Manyata & family say he will return a winner this time too, Amen. He is the worthy son of nation's favourite, actor, parliamentarian, social & political activist, a true nationalist, late &

    — Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ संजय दत्तने 11 ऑगस्टला ट्विट करत वैद्यकीय कारणामुळे काही काळासाठी विश्रांती घेत असल्याचे जाहीर केले. श्वसनाला त्रास होत असल्याने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात 8 ऑगस्टला दाखल झाला होता. मात्र, प्रकृती ठीक असल्याने रुग्णालयाने 10 ऑगस्टला संजय दत्तला घरी सुट्टी दिली.

great #SunilDutt. Hope,wish & pray Sanju for your smooth & fast recovery. God Bless! Love & profound regards to the family. pic.twitter.com/uRdNdcazlw

— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी 61 वर्षीय संजुबाबाला आजारातून बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जुन्या आठवणी ताज्या करणारा एक फोटोही त्यांनी समाज माध्यमातून शेअर केला आहे. त्यांनी म्हटले, की देशाचा आवडता , अभिनेता, खासदार, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता, खरा राष्ट्रप्रेमी असलेल्या दिवंगत व थोर अशा सुनील दत्त यांचा तो सुपुत्र आहे. तू योद्धा आहेस. लवकरच परतणार आहेस. लवकर बरे होण्याची आशा, शुभेच्छा आणि प्रार्थना आहे. आशिर्वाद आहे! सर्व कुटुंबाला प्रेम, असे त्यांनी समाज माध्यमातील पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने चाहत्यांचे आभार मानले आहेत. या टप्प्यावर तुमच्या शक्तीची आणि प्रार्थनेची गरज आहे. गेली काही वर्षे कुटुंब वेगवेगळ्या टप्प्यातून गेले आहे. मला खात्री आहे, ही वेळही निघून जाईन. अफवावर विश्वास ठेवू नका, असेही मान्यताने चाहत्यांना आवाहन केले आहे. दरम्यान, संजय दत्तची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तब्येत चांगली असल्याचे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संजय दत्तने ट्विट केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.