मुंबई - सुशांतसिंह राजपूतची मोठी बहिण श्वेता सिंह हिने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना फार मोठी धक्का बसला होता. प्रार्थना सभेनंतर तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये, 'प्रेम आणि सकारात्मकेतेने माझा लहान भाऊ भरलेला होता. तू जिथे असशील तिथे आनंदित राहा. आम्ही तुझ्यावर नेहमी प्रेम करु', असे तिने म्हटलंय.
या पोस्टसह तिने एक फोटोही शेअर केलाय. यात सर्व कुटुंबिय सुशांतच्या फोटोसमोर प्रार्थनेसाठी बसलेले दिसतात. श्वेताने या अगोदरही काही पोस्ट शेअर केल्या होत्या. नंतर तिने या पोस्ट डिलीटही केल्या होत्या.
सुशांतच्या तेरवी निमित्त परिवाराच्या वतीने एक निवेदन प्रसिध्द करण्यात आलंय. यात लिहिलंय, "सुशांत एका गुलशनसारखा होता. स्वच्छ मनाचा, बोलका आणि तेज बुध्दीचा. प्रत्येक गोष्टीसाठी उत्साही असणारा. मोठी स्वप्न पाहून पूर्णत्वाकडे नेणारा आणि निखळ हसणारा. तो कुटुंबियांसाठी प्रेरणादायी होता. एक दुर्बीन नेहमी जवळ ठेवायचा, त्यातून तारे पाहायचा. त्याचे सहज हसू आम्ही पुन्हा पाहू शकणार नाहीत, असा कधीच विचार केला नव्हता. त्याचे जाणे कुटुंबियांसाठी रिकामेपण देणारे आहे, जे कधीही भरुन न येणारे आहे. तो आपल्या सर्व चाहत्यांवर भरपूर प्रेम करायचा. आमच्या गुलशनवर तुम्ही जो प्रेमाचा वर्षाव केलाय त्याबद्दल धन्यवाद."
हेही वाचा - सुशांतच्या वडिलांना भेटून ऊर्जा अन् हिंमत मिळाली - रतन राजपूत
सुशांतसिंह राजपूतचे निधन १४ जूनला मुंबईत झाले होते. त्याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याला डिप्रेशनचा त्रास होता. यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे असे सांगितले जात आहे. मात्र त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेल्याचा आरोप काहीजण करीत आहेत. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.