मुंबई - संघर्ष मानवाला बरेच काही शिकवतो, असे रॅपर हनी सिंगने म्हटसे आहे. काळसोबत बदलण्यासाठी संघर्षाने खूप मदत केली असेही तो म्हणाला,
हनी सिंगने सांगितले, संघर्षाशिवाय मिळालेल्या यशात काही मजा नाही. संघर्ष आवश्यक आहे. संघर्ष माणसाला खूप काही शिकवतो. काळ बदलण्यासोबत माझ्यातही खूप बदल झाले आहेत. आयुष्यात थोडा फार संघर्ष असलाच पाहिजे.
'अंग्रेजी बीट', 'ब्राउन रंग' आणि 'लव डोज' यासारख्या धमाकेदार गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या हनी सिंगने आपल्या कारकीर्दीतील सुरुवातीच्या काळातल्या संघर्षाचे स्मरण केले.
तो पुढे म्हणाला, "लोक मला माझ्या सुरुवातीच्या काळातील संघर्षांबद्दल विचारतात. संघर्ष पूर्वी होता, तो आजही आहे आणि रहाणार उद्याही आहे. संघर्ष केल्याशिवाय लढायला उत्साह नाही. मला वाटते संघर्ष चांगला आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात मी खूप संघर्ष केला आहे. "
हनी सिंग अलीकडेच आपले 'बिल्लो तू आग' गाणे घेऊन आला आहे. 'मखना' नंतर त्याचे सिंहस्टाबरोबरचे हे दुसरे गाणे आहे.