मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलवर चित्रपट निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. झारखंडचे निर्माता अजय कुमार सिंह यांनी तिच्यावर हा आरोप केला आहे. एका चित्रपटासाठी अमिषाने त्यांच्याकडून २.५ कोटी रुपये घेऊन परत न केल्यामुळे त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
मागच्या वर्षी अजय कुमार यांनी अमिषाला एका चित्रपटासाठी पैसे दिले होते. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पैसे परत देण्यात येतील, असा करारही त्यांच्यात झाला होता. मात्र, नंतर अमीषाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तिने ३ कोटींचा चेक दिला होता. मात्र तो चेक बाऊंस झाल्याचे अजय कुमार यांनी सांगितले आहे.
अमिषाला याबाबत विचारण्यात आले असता, तिने अजय कुमार यांना प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे फोटो दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. अद्याप तिचा चित्रपटही प्रदर्शित झाला नाही. मात्र, तो चित्रपट प्रदर्शित होईल याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही, असेही अजय कुमार यांनी म्हटले आहे.