ETV Bharat / sitara

"ते मला जेव्हाही फोन करायचे मी अटेंशनमध्ये उभा राह्यचो"

author img

By

Published : May 2, 2020, 2:04 PM IST

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर ह्रतिक रोशन यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.ह्रतिकने ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नितू सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Hrithik Roshan On His Chintu Uncle
ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नितू सिंग

मुंबई - ह्रतिक रोशन याला २०१२ मध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या निघून जाण्याने त्याला दुःख झालंय. त्याने चिंटू अंकल यांची आठवण जागवत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

त्याने एक फोटो शेअर केला असून यात ऋषी कपूर, नितू सिंग आणि ह्रतिक दिसत आहेत.फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''तुमच्या प्रेमामध्ये इतकी उर्जा होती की, जेव्हाही तुमचा फोन यायचा तेव्हा मी उठून अटेंशनमध्ये उभे राह्यचो. मी आयुष्यात असे कधी केले नव्हते. पापा मला नेहमी फोन करुन सांगायचे चिंटू अंकलने तुझा सिनेमा पाहिला आहे आणि त्यांना मजा आली. मी लगेच उठायचो, आनंदाने नाचू लागायचो.''

ह्रतिकने पुढे लिहिलंय, ''तुम्ही यातून मला स्वतःवर विश्वास ठेवता आला. कमजोर क्षणाला ताकत दिली. ऋषी कपूर यांनी माझा सिनेमा पाहिला, हा विचार करणेही माझ्यासाठी अद्भूत होते. माझ्या चुका दाखवल्याबद्दल, पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल, माझ्या लहानपणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. मेहनतीचे महत्त्व समजवल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला नेहमी स्मरणात ठेऊ.''

ऋषी कपूर यांचे निधन ३० एप्रिल रोजी झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.