ETV Bharat / sitara

सिंटा (CINTAA) च्या सभासदांसाठी ह्रतिक रोशनची २० लाखांची देणगी!

author img

By

Published : Jun 4, 2021, 5:15 PM IST

सुपरस्टार ह्रतिक रोशनने गेल्यावर्षी अनेकांना मदत केली होती आणि या खेपेस त्याने मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून थेट सिंटा (CINTAA) ला २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. सिंटा (CINTAA) फिल्म इंडस्ट्रीमधील ३२ श्रेणीच्या कलाकार व कामगारांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यामुळेच ही मदत योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगूनच ह्रतिकने हे पाऊल उचलले.

सुपरस्टार ह्रतिक रोशन

गेल्यावर्षीपासून सूर झालेला कोरोना उद्रेक संपुष्टात येण्याचे काहीच चिन्ह दिसत नाहीये. यावर्षीच्या सुरुवातीला तसा थोडाफार आभास निर्माण झाला होता. परंतु फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा भारताला ग्रासले. त्यामुळे महाराष्ट्रासकट कित्येक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला. याचा सर्वांनाच आर्थिक झटका बसला तरी मनोरंजनसृष्टीला जबर फटका बसला आहे. या इंडस्ट्रीमधील रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे अतोनात हाल झाले असून यावेळेस फार कमी लोकं मदतीसाठी पुढे आले. सुपरस्टार ह्रतिक रोशनने गेल्यावर्षी अनेकांना मदत केली होती आणि या खेपेस त्याने मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून थेट सिंटा (CINTAA) ला २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. सिंटा (CINTAA) फिल्म इंडस्ट्रीमधील ३२ श्रेणीच्या कलाकार व कामगारांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यामुळेच ही मदत योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगूनच ह्रतिकने हे पाऊल उचलले.

ह्रतिकने पुढे केलेला मदतीचा हात, जवळपास ५००० लोकांना मदत करेल. ही रक्कम सिंटा (CINTAA) असोसिएशनच्या ५ हजार सदस्यांचे लसीकरण आणि दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरविण्यासाठी वापरणार आहे. हा अभिनेता या संकटकाळात लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न करीत असतो. कोविड-१९ च्या पहिल्या लाटेत देखील, ह्रतिकने सिंटा (CINTAA) ला २५ लाखाची आर्थिक मदत केली होती, ज्यातून ४ हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली होती. ह्रतिक अनेक गरजू लोकांची सक्रियपणे मदत करत असतो.

ह्रतिक रोशनने पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (CINTAA) सदस्यांच्या मदतीसाठी यावेळी पुढाकार घेतला असून त्याने असोसिएशनला २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. यातून दारिद्र्य रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करण्यात येणार आहे. या मदतीचा फायदा सिंटाच्या ५ हजार सदस्यांना होणार आहे. या पुढकराविषयी ऋतिक रोशनचे आभार मानताना सिंटा (CINTAA)चे महासचिव, अमित बहल म्हणाले की, "ह्रतिक रोशनने मागच्या लॉकडाउनच्या वेळेस देखील आमची मदत केली होती. या वेळी, त्यांनी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या ५००० सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार आहे." मुंबई पोलिसांसाठी हँड सॅनिटाइजर्सपासून फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या आरोग्य सुरक्षेमध्ये योगदान देण्याबरोबरच ह्रितिकने कोविड-१९ रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलेंडर आणि काँसंट्रेटर्सची व्यवस्था केली.

पडद्यावरील सुपरहिरो ह्रतिक रोशनला त्याची ही सामाजिक बांधिलकी वास्तविक जीवनातही नक्कीच सुपरहिरो बनविते.

हेही वाचा - HBD अशोक सराफ : रंगभूमीवरचा 'विदुषक' बनला चित्रपटसृष्टीचा 'मामा'!!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.