ETV Bharat / sitara

‘सीआयडी’ मधील ‘तोड दे दरवाजा दया’ चा दयानंद शेट्टी करतोय मराठीत पदार्पण!

१९९८ मध्ये 'सीआयडी' मालिकेत मिळालेली सीआयडी ऑफिसरची भूमिका दयाच्या करियरला कलाटणी देणारी ठरली. 'जब दया का हाथ पडता है, तो मुंह के अंदर दातों से पियानो बजने लगता है...' हा या मालिकेतील डायलॅागही खूप गाजला आहे. हाच दया आता 'गरम किटली' घेऊन मराठी रसिकांसमोर येणार आहे.

दयानंद शेट्टी
दयानंद शेट्टी
author img

By

Published : Mar 10, 2022, 12:01 PM IST

मराठी चित्रपट आशयघनतेसाठी ओळखले जातात आणि इतर भाषिक कलाकारही मराठी चित्रपटांतून कामं करताना दिसतात. मराठी चित्रपटांची ख्याती इतकी दूरवर पसरलीय की, हिंदीसोबत दक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनाही मराठीत काम करण्याचे वेध लागले आहेत. टेलिव्हीजन विश्वातील सर्वात मोठा क्राईम शो ठरलेल्या 'सीआयडी' या मालिकेतील एसीपी प्रद्युम्नसोबत आणखी एक कॅरेक्टर खूप पॅाप्युलर झालं, ते म्हणजे दया. ‘तोड दे दरवाजा दया’ या एसीपी प्रद्युम्नच्या आज्ञेवर एका लाथेत दरवाजा तोडणारा दया प्रेक्षकांचा लाडका झाला होता.

मराठी प्रेक्षकांना आपल्या मातृभाषेतील चित्रपटामध्ये दयाचा जलवा पहायला मिळणार आहे. दयानं आजवर बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं आहे. यासोबतच थिएटर आर्टिस्ट म्हणून पुरस्कारही जिंकले आहेत. तुळू भाषेतील 'सिक्रेट' या नाटकातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. १९९८ मध्ये 'सीआयडी' मालिकेत मिळालेली सीआयडी ऑफिसरची भूमिका दयाच्या करियरला कलाटणी देणारी ठरली. 'जब दया का हाथ पडता है, तो मुंह के अंदर दातों से पियानो बजने लगता है...' हा या मालिकेतील डायलॅागही खूप गाजला आहे. हाच दया आता 'गरम किटली' घेऊन मराठी रसिकांसमोर येणार आहे.

आपल्या मित्रमंडळीत दया याच नावानं ओळखला जाणारा अभिनेता दयानंद शेट्टीही आता मराठीत पदार्पण करतोय. नुकत्याच मुहूर्त झालेल्या 'गरम किटली' या मराठी चित्रपटात दया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये दया नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. यात दयासोबत आदित्य पैठणकर व श्रद्धा महाजन ही नवी जोडी आणि विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील आदी कलाकार आहेत. राज पैठणकरनंच यातील गीतरचना केल्या असून, किरण-राज या संगीतकार जोडीनं त्या संगीतबद्ध केल्या आहेत.

गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'गरम किटली' या चित्रपटाची निर्मिती केली जात असून चित्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कथा, पटकथा आणि संवादलेखन करणारे राज पैठणकर या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहेत. नुकताच मुहूर्त झाल्यानंतर लगेचच 'गरम किटली'च्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'बच्चन पांडे'चे प्रमोशन करताना 'परम सुंदरी' क्रिती सेनन! पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.