ETV Bharat / sitara

'अतरंगी रे'साठी शाहजहांच्या अवतारात अक्षय कुमार

author img

By

Published : Dec 21, 2020, 3:43 PM IST

अक्षय कुमारच्या आगामी ‘अतरंगी रे’ चित्रपटातील शाहजहां अवतारा पाहायला मिळाला आहे. अक्षयने एक व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली असून यात तो हातात गुलाब घेऊन ताजमहल समोर स्वतःभोवती गिरक्या घेताना दिसत आहे.

Akshay Kumar twirls in front of Taj Mahal
अक्षय कुमारची अंतरंगी अवतार

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘अतरंगी रे’ चित्रपटातील त्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो मुगल सम्राट शाहजहांच्या अवतारात दिसत असून हातात गुलाब घेऊन तो ताजमहल समोर स्वतःभोवती गिरक्या घेताना दिसत आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयची नायिका सारा अली खान आहे. तिनेही अक्षयचा हा लूक शेअर केलाय.

यापूर्वी साराने सोशल मीडियावर म्हटले होते की, अक्षय कुमारसोबत स्क्रीन स्पेस शेअर करायला मिळत असल्यामुळे ती खूप उत्साहित आहे. याबाबत ती स्वतःला धन्यही समजत आहे.

क्रॉस-कल्चरल लव्ह स्टोरी म्हणून या चित्रपटाची ओळख झाली आहे. सारा बिहारमधील एका मुलीची भूमिका करीत आहे. या चित्रपटात ती धनुष आणि अक्षयसोबत रोमँटिक गाण्यांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा - कार्तिक आर्यनने करुन दिली 'धमाका'मधील अर्जुन पाठकची ओळख

लॉकडाउनपूर्वी सारा आणि धनुषने वाराणसीमध्ये चित्रपटाचे पहिले शेड्यूल संपवले होते. हिमांशु शर्मा लिखित हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात निमरत कौर देखील आहे.

हेही वाचा - पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती पहिल्यांदाच येणार एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.