नवी दिल्ली - एलजीने एबीएस-एफएन७ आणि एचबीएस-एफएन६ टोन फ्री श्रेणीत मेरिडियन ओडिओच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मेरिडियन ओडिओ ही ब्रिटनची ओडिओ तंत्रज्ञान कंपनी आहे.
मेरिडियन ओडिओ ही कंपनी एलजीसाठी उच्चक्षमतेच्या ध्वनीसाठी मदत करणार आहे. कंपनीने एलजी ओडियामध्ये डिजीटल सिग्नल प्रोसिसिंगची जोड दिली आहे. मेरिडियन ही गेल्या २५ वर्षांपासून ओडिओ तंत्रज्ञानात आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या लसीला मान्यता मिळाल्याने शेअर बाजाराचा मोठा 'डोस'
- एलडी टोनफ्री एफएन७ मुळे खऱ्या आवाजाचा भास होता. तसेच स्पष्ट आणि उत्कृष्ट आवाज येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- एलजी टोनफ्री अॅप हे अँड्राईडसह आयओएस डिव्हाईसमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये एलईडी सर्वात वर देण्यात आले आहे. त्यामुळे चार्जिंगवर देखरेख ठेवता येते.
- युव्हीनॅनो दर्जा टिकविता येतो. एअरबड्स हे कानात बसण्यासाठी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. यामध्ये लवचिक आणि, वैद्यकीय दर्जाचे जेल वापरण्यात आले आहे.
- हे एअरबड्स कानाच्या आकाराचे आहे.एफएन ७ मध्ये सी अॅक्टिव्ह नॉईज सी आहे.
हेही वाचा-लसीची किंमत सरकारसाठी २१९ ते २९२ रुपये-आदार पुनावाला