हैदराबाद - आता पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाण्यासाठी जाल, तेव्हा एखाद्या वैज्ञानिक थ्रिलर चित्रपटाचे दृष्य असू शकेल. तुमच्या तिकिटाची जागा फोनवरील क्यूआर कोडने घेतलेली असेल; दरवाजाच्या चौकटीला बसवलेल्या मेटल डिटेक्टरची जागा हातात धरण्याच्या मेटल डिटेक्टरने घेतलेली असेल; ज्या प्रकारचे मेटल डिटेक्टर विमानतळांवर वापरण्यात येतात; ग्राहक आणि तिकिट घर यांच्यात प्लास्टिक ग्लास; आणि प्रेक्षागृहात आसनांची रचना क्लस्टरप्रमाणे असेल आणि त्यासोबत योग्य सामाजिक अंतर राखण्यासाठी खूण म्हणून मार्कर्स असतील. आणि अर्थातच, प्रत्येकाला आपल्याबरोबर स्वतःचे सॅनिटायझर आणि मास्क बाळगावा लागेल आणि जर ते थ्रीडी चित्रपट पहात असतील तर त्यांना स्वतःचा थ्रीडी चष्मा विकत घ्यावा लागेल.
चित्रपट पाहण्याच्या या नव्या विश्वात स्वागत आहे, जे १५ जून ते १५ जुलैदरम्यान कोणत्याही क्षणी खुले होईल, असा आशादायक अंदाज आहे. अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या भूमिका असलेला, रोहित शेट्टीचा १३५ कोटी रुपये गुंतवलेला सूर्यवंशी; १२५ कोटी रुपये खर्चाचा कबीर खानचा ८३ ज्यात रणवीर सिंग कपिलदेवच्या भूमिकेत आहे; १०० कोटी बजेटचा राधे; ज्यात तुमचा सर्वात आवडता भाईजान सलमान खानची भूमिका आहे, बॉलिवुड आता प्रतीक्षा करू शकत नाही. काही चित्रपट निर्माते आपला चित्रपट प्रदर्शित करण्यास इतके उतावीळ झाले आहेत की आपले चित्रपट थेट ओटीटीवर प्रसिद्ध करण्याची त्यांची तयारी आहे, ज्यामुळे विशेषतः आयनॉक्स लेजरकडून या आठवड्यात तीव्र प्रतिसाद आला आहे, ज्यांच्या मालकीची देशभरात ६२० चित्रपटगृहे आहेत. ओटीटीवर जागतिक प्रिमिअरची चळवळ सुरू करणाऱ्या 'गुलाबो सिताबो' चित्रपटाचा निर्मात्याचे वर्णन संकटाच्या काळात साथ सोडून देणारा मित्र असे करून, आयनॉक्सने आपल्या निवेदनात सूड घेतला जाईल, असे म्हटले आहे. तर प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंड़ियानेही तितक्याच आक्रमकपणे उत्तर देताना वित्तपुरवठ्यावरील वाढत्या व्याजाचा खर्च, विमा संरक्षणाचा अभाव, चित्रपटगृहे पुन्हा कधी सुरू होतील, याबाबतची अनिश्चितता आणि न वापरलेल्या किंवा सोडून द्याव्या लागलेल्या सेट उभारणीवरील खर्च ही कारणे निर्णयासाठी दिली आहेत.
देशभरातील ९ हजार चित्रपटगृहांपैकी ८५० चित्रपटगृहांवर नियंत्रण असलेल्या पीव्हीआरचे अध्यक्ष आणि एमडी अजय बिजली यांनी, या युद्धात सहभागी होण्यास नकार दिला असून त्याऐवजी चित्रपटांच्या जादूविषयी मत व्यक्त केले. हा काही रचनात्मक परिवर्तन नाहि तर विकृती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. स्ट्रीमिंग सेवांच्या बदल्यात कोणत्याही निर्मात्याला मोठा पडदा असलेल्या चित्रपटगृहांच्या द्वारे येणार्या उत्पन्नाचा त्याग करावा वाटणार नाही. शेवटी, चित्रपटाचे ४५ टक्के उत्पन्न अजूनही चित्रपटगृहांमधूनच येतो तर, उर्वरित उत्पन्न हे प्रसारण आणि डिजिटल हक्क यातून येते.
चित्रपटगृहांतून येणारे उत्पन्नाचेच अजूनही कमालीचे वर्चस्व आहेच, पण अनेक चित्रपट निर्मात्यांचा लहान चित्रपट बनवण्याचे दिवस आले आहेत, यावर विश्वास बसला आहे. मोठी चित्रपटगृहे हे आता जवळपास बंद होण्याच्या निकट आहेत. कोरोनानंतरच्या काळात जग स्पष्टपणे मोठा गाजावाजा करून बनवण्यात आलेले बिग बजेट चित्रपट पडद्यावर आणि त्यात भारतीय बॉक्स ऑफिसला १० टक्के योगदान देणारे हॉलिवुडचे ध्वनिमुद्रित केलेले चित्रपटांचा त्यात समावेश असेल आणि लहान बजेटचे चित्रपट आणि मालिका स्ट्रिमिंग मंचावर दाखवले जातील. काही चित्रपट निर्माते दोन्ही प्रकारचे चित्रपटकथा सांगू शकतात ते आनंदात आहेत. अनु मेनन यांनी अमेझॉन प्राईमच्या फोर मोअर शॉट्सचे पहिल्या मोसमात निर्देशन केले आणि विद्या बालन यांची भूमिका असलेल्या शकुंतलादेवीच्याही त्या दिग्दर्शिका आहेत. मोठ्या पडद्यासाठी बनवलेला हा चित्रपट, आता अमेझॉन प्राईमवर त्याचे प्रिमिअर केले जात असून त्यासोबत प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचे आच्छादन असून ज्यात कीर्ति सुरेश (पेंग्विन), ज्योतिका (पोनमगल वंधल) आणि आदिती राव हैदरी( सुफियन सुजात्यम) अशा प्रसिद्ध तारका आहेत. मालिका आणि चित्रपट यांचा कथा सांगण्याचा ताल अत्यंत वेगळा असतो. परंतु मी कथा सांगणारी आहे. माध्यम कोणतेही असो, जास्तीत जास्त चांगल्या रितीने मी कशी कथा सांगू शकते, याकडे माझे लक्ष असते, असे त्या म्हणतात. आजच्या बिकट काळात आपला चित्रपट २०० देशांमधील व्यापक प्रमाणावरील प्रेक्षकांपर्यंत पोहचतो आहे, यामुळे त्या अत्यंत आनंदित झाल्या आहेत. त्या म्हणतात की आपले जीवन सर्व संकटांचा सामना करून संपूर्णतेने जगणार्या स्त्रीविषयीचा हा चित्रपट आहे. एक आई आणि तिची मुलगी यांची ही सुंदर कथा आहे. अशा कथा लोकांना आपल्या कुटुंबियांसमवेत पहाव्या वाटतील.
दुसरा मोठा प्रश्न हा आहे की आता चित्रिकरणास केव्हा आणि कशी सुरूवात होणार? कलाकार आणि तंत्रज्ञ वगैरेंच्या संरक्षणासाठी निश्चितच स्वच्छता आणि सुरक्षेचे नियम असणार आहेत. अनेक चित्रपट जवळपास पूर्ण झाले आहेत, अर्धे तयार आहेत किंवा अगदी सुरू होण्याच्या बेतात होते. फॉरेस्ट गंपचा रिमेक लालसिंग चढ्ढा यात आमिर खानला दिग्दर्शित करणारे अद्वैत चंदन म्हणतात की माझे कलाकार झोनमध्य़े होते आणि चित्रिकरण उत्तम चालले होते.आता मोठ्या कारगिल युद्धाचे चित्रिकरण आणि मुंबई आणि दिल्लीतील काही दिवसांचे चित्रिकरण प्रलंबित आहे. डिसेंबरमध्ये तो प्रदर्शित होण्याचे नियोजन होते आणि जरी बरेचसे व्हीएफएक्सचे काम करायचे उरले असले तरीही त्यांना अजूनही राहिलेल्या वेळात आपण तो पूर्ण करू, अशी आशा आहे. दिबाकर बॅनर्जी यांच्या नेटफिक्स चित्रपटाचे काही दिवसांचे चित्रिकरण बाकी असून कश्मिरी कुटुंबाच्या तीन पिढ्यांवर तो आधारित आहे, तर अनुराग कश्यप यांच्या तरूण प्रेमकथेचे चार दिवसांचे चित्रिकरण उरले आहे. ते सर्व जण पुन्हा काम सुरू होण्याची वाट पहात आहेत, तर करण जोहर ज्याने आपल्या मुघल खंडकाव्य तख्तच्या सेटिंगसाठी मुंबईत २५० कोटी रूपये खर्च केले आहेत, चित्रिकरण सुरू होण्याची वाट पहात आहे.
परंतु सध्याच्या वातावरणात, प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे आणि चित्रपट उद्योग अप्रत्यक्षपणे ५० लाख लोकांना रोजगार देत असला तरीही, केंद्र किंवा राज्य सरकार दोघांच्याही विषयपत्रिकेवर त्याचा मुद्दाच नाही. अनेक चित्रपटगृहे मॉल्समध्ये आहेत, जे चित्रपट पहायला जाण्याच्या अनुभवाला आणखी धोका वाढवू शकतात. अमेरिकेत, ख्रिस्तोफर नोलान यांना त्याच्या टेनेट या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे १७ जूनला राष्ट्रव्यापी प्रदर्शन होण्याची आशा असून त्यामुळे प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांकडे येतील असे वाटते. पण तेथे चित्रपट उद्योगाचे काम वेगळ्या प्रकारे चालते. अमेरिकेत ४ प्रमुख स्टुडिओ आहेत आणि वितरकांची मोठी साखळी आहे. तेथे निर्णयांची अमलबजावणी केवळ काही फोन कॉल्सवर करता येते आणि भारतात अमेरिकेला जेथे २०० चित्रपट बनतात तेथे दरवर्षी १००० ते १२०० चित्रपट बनत असले तरीही निर्माते तुकड्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आहेत. पण त्याचा असाही अर्थ होतो लोकांची चित्रपटांसाठीची भूक ही खूप मोठी आहे. एक लहानसा विषाणु ती नष्ट करू शकेल काय?
- कावेरी बामझाई