ETV Bharat / lifestyle

ओप्पोच्या वापरकर्त्यांना खूशखबर 'या' तारखांना मॉडेलवर मिळणार अपडेट - F 19 + Pro sale

ए५ २०२० आणि ए९ २०२० ३ जीबी हे अपग्रेड होणार नाहीत. कारण त्यामध्ये कमी रॅम स्टोरेज आहे.

ओप्पो
ओप्पो
author img

By

Published : Jun 15, 2021, 3:31 PM IST

नवी दिल्ली - जर तुम्ही ओप्पो स्मार्टफोनच्या नव्या अपडेट मॉडेलची वाट पाहत असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. स्मार्टफोन ब्रँड ओप्पोने अँड्राईड ११ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित वेगवान काम करणारा कलर ओएस ११ हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

ओप्पो ए५३ हे १७ जूनला आणि ओप्पो एफ १७ तर २६ जूनला अपडेट होणार आहे. तर ओप्पो ए५४ हा १६ जूनला आणि ओप्पो रेनो हा २९ जूनला अपडेट होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओप्पोच्या रेनो, एफ आणि ए श्रेणीमधील स्मार्टफोनचे अपडेट दिले जाणार आहे. त्यामधून कस्टमाईज्ड युझर इंटरफेस आणि फ्लेक्सड्रॉप, थ्री फिंगर ट्रान्सलेट यांच्या अपडेटचा समावेश आहे.

हेही वाचा-मोफत धान्यांसह लसीकरणाकरिता सरकारवर अतिरिक्त १.०५ लाख कोटींचा भार- एसबीआय

हा स्मार्टफोन होणार नाही लाँच-

ओप्पोचे जगभरात ३७ कोटी वापरकर्ते आहेत. कलरओएस हे जगभरातील ८० हून अधिक भाषांना सपोर्ट करते. ए५ २०२० आणि ए९ २०२० ३ जीबी हे अपग्रेड होणार नाहीत. कारण त्यामध्ये कमी रॅम स्टोरेज आहे.

हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत महागाई वाढून मे महिन्यात ६.३ टक्क्यांची नोंद

तीन दिवसांत ५ जी स्मार्टफोनच्या विक्रीतून २३० कोटींचा व्यवसाय

नुकतेच कंपनीने एफ १९ प्रो प्लस डिव्हाईस हे ५ जी स्मार्टफोन विक्रीत आघाडीवर ठरल्याचे म्हटले होते. या स्मार्टफोनची किंमत २५ हजार ते ३० हजार रुपये आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये ५ जी स्मार्टफोनच्या विक्रीत एफ १९ प्रो प्लस हा स्मार्टफोन आघाडीवर असल्याचे काउंटरपाँईट रिसर्चने म्हटले आहे. ओप्पोच्या स्मार्टफोनची अहमदाबाद, बंगळुरू आणि मुंबईमध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. एफ १९ प्लस प्रोने तीन दिवसांमध्ये विक्रीतून २३० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

हेही वाचा-स्पाईसजेट कंपनीच्या सर्व केबीन क्रू कर्मचाऱ्यांना मिळाला लशीचा पहिला डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.