सेऊल - एलजी इलेक्ट्रॉनिक्सने शुक्रवारी रोलेबल टीव्ही विदेशातील बाजारपेठांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली आहे. उच्च दर्जा आणि किमतीच्या बाजारपेठेत कंपनीने विस्तार करण्याचे नियोजन केले आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्सने रोलेबल टीव्ही पहिल्यांदा दक्षिण कोरियामध्ये ऑक्टोबर लाँच केला होता. या टीव्हीची किंमत 88,500 डॉलर आहे. एलजी कंपनीने सिग्नेचर ओएलईडी आर टिव्ही हा जागतिक वेबसाईटमध्ये गुरुवारपासून विकण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-मारुतीसह टोयोटाच्या वाहन विक्रीत मार्चमध्ये दुप्पटीने वाढ
- टीव्ही उद्योगातील पहिला रोलेबल टीव्ही हा अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्स अशा 15 निवडक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे.
- कोरोना महामारीमुळे कंपनीने ऑफलाईन मार्केटिंग आणि विक्री करण्याऐवजी ऑनलाईन विक्री करण्याचे नियोजन केले आहे.
- रोलेबल टीव्ही हा बॉक्समध्ये बसतो. या टीव्हीमध्ये स्वयंप्रकाश असलेली पिक्सेल तंत्रज्ञान आहे. प्रिमियम टीव्ही मार्केटमधील एलजीचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी व ग्राहकांना वेगळा अनुभव देण्यासाठी डिझाईटनचा वापर केला आहे.
- आलिशान घड्याळे आणि कार यांच्या उत्पादन आणि गुणवत्तेची चाचणीप्रमाणे एलजी रोलेबल टीव्हीच्या चाचण्या घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- मार्केट संशोधन कंपनी ओएमडियाच्या माहितीनुसार एलजी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची टीव्ही व्हेंडर कंपनी आहे.पहिल्या क्रमांकावर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
हेही वाचा-बजाजच्या वाहनांच्या विक्रीत मार्चमध्ये 52 टक्क्यांनी वाढ