बोगोटा : नैऋत्य कोलंबियातील एका तुरुंगात सोमवारी आग ( Prison fire in southwest Colombia ) लागल्याची घटना घडली. या लागलेल्या आगीत 49 जणांचा ( Prison fire kills 49 ) मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय तुरुंग प्रणालीचे संचालक टिटो कॅस्टेलानोस यांनी रेडिओ कॅराकोलला सांगितले की मृतांमध्ये किती कैदी आहेत हे स्पष्ट नाही. तुलुआ शहरातील मध्यम-सुरक्षा तुरुंगात दंगलीच्या प्रयत्नात सोमवारी सकाळी आग लागली, असे त्यांनी सांगितले.
कॅस्टेलानोस म्हणाले की, कैद्यांनी परिणामांचा विचार न करता गाद्या पेटवल्या. राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे ( President Ivan Duke order of inquiry ) सांगितले आहे.
हेही वाचा - G-7 Group Countries : जी-7 गटातील देशांनी युक्रेनला शक्य तितकी मदत करण्याचा केला संकल्प