बँकॉक - ईशान्य थायलंडमध्ये एका सैनिकाने लोकांवर अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे २० जण ठार तर, १४ जण जखमी झाले आहेत. शनिवारी लष्कराचा तळ आणि एका शॉपिंग मॉलमध्ये या सैनिकाने लोकांवर बेछूट गोळीबार केला. अचानक झालेल्या प्रकारामुळे लोकांमध्ये घबराट पसरली.
या हल्लेखोर सैनिकाने प्रथम शस्त्रांची चोरी केली. त्यानंतर त्याच्या कमांडरला ठार केले. त्यानंतर सुरथाम्पिथक लष्करी तळावर आणखी दोघांना ठार केले. यानंतर तो लष्करी वाहन घेऊन तेथून गायब झाला. त्यानंतर त्याने नाखोन रात्चासिमा प्रांतात शॉपिंग मॉलवर गोळीबार केला. या हल्ल्याचे त्याने आपल्या फेसबुक पेजवर लाईव्हही केले.
या घटनेत ठार झालेल्या कमांडरचे नाव कर्नल अनांथारोत क्रॅसी असे आहे. याच्यासोबतच हल्लेखोर सैनिकाचा वाद झाला होता.