बँकॉक - थायलंडमध्ये रविवारी एक मालवाहू ट्रेन आणि बस यांच्या धडकेत 17 जण ठार झाले. तर, इतर 30 जण जखमी झाले आहेत. येथील सरकारी अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची माहिती दिली.
वृत्तसंस्था सिन्हुआने मुख्य जिल्हाधिकारी प्रथुआंग युकासेम यांचा हवाला देत अपघातावेळी बसमध्ये 65 प्रवासी असल्याची माहिती दिली. चेचोंग्सो प्रांतातील के बँग टॉय भागात रेल्वे क्रॉसिंग पार करता या बसला अपघात झाला.
हेही वाचा - अमेरिका निवडणुकीत गाजतोय मास्कचा मुद्दा; बायडेन यांनी शेअर केला भन्नाट फोटो
बचाव पथकाद्वारे जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयांमध्ये पोहोचवण्यात आले. सामुत प्रकान प्रांतातील चाचोन्गासाओमधील एका मंदिराकडे निघालेल्या या बसला मोठा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की, बस पलटी झाली.
चोनबुरी प्रांतातील लीम चबँग बंदराहून निघालेली ही ट्रेन बँकॉकच्या लाट क्रेबंगला जाण्याच्या मार्गावर होती. या अपघाताचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - अफगानिस्तानमध्ये शक्तिशाली स्फोटात १३ नागरिकांचा मृत्यू