वॉशिंग्टन/नवी दिल्ली - अमेरिकन संसद सदस्य ब्रॅड शेरमन यांनी अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्ष व्ही. श्रिंग्ला यांची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावावी, अशी मागणी केली,' असे ट्विट ट्रम्प यांनी केले होते. यावर 'प्रत्येकाला माहिती आहे की, पंतप्रधान मोदी अशा प्रकारची सूचना कधीही करणार नाहीत. ट्रम्प यांचे हे विधान अत्यंत निरर्थक, भ्रमित करणारे आणि शरमिंदा करणारे आहे,' असे ट्विट शेरमन यांनी केले आहे.
-
I just apologized to Indian Ambassador @HarshShringla for Trump’s amateurish and embarrassing mistake. 2/2https://t.co/EjcPaNVM0M
— Rep. Brad Sherman (@BradSherman) July 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I just apologized to Indian Ambassador @HarshShringla for Trump’s amateurish and embarrassing mistake. 2/2https://t.co/EjcPaNVM0M
— Rep. Brad Sherman (@BradSherman) July 22, 2019I just apologized to Indian Ambassador @HarshShringla for Trump’s amateurish and embarrassing mistake. 2/2https://t.co/EjcPaNVM0M
— Rep. Brad Sherman (@BradSherman) July 22, 2019
'दक्षिण आशियातील विदेश धोरणाविषयी माहिती असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे की, भारताने काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला नेहमीच विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी अशा प्रकारची सूचना कधीही करणार नाहीत. ट्रम्प यांचे हे विधान अत्यंत निरर्थक, भ्रमित करणारे आणि शरमिंदा करणारे आहे,' असे ट्विट शेरमन यांनी केले आहे.
यानंतर दुसरे ट्विट करत शेरमन यांनी भारतीय राजदूत हर्ष श्रिंग्ला यांची ट्रम्प यांच्या बालिश आणि शरमिंदा करणाऱ्या चुकीसाठी माफी मागत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी काश्मीर विषयी मोदींनी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याच्या दाव्यानंतर भारतात राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे विधान खरे आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच, ते खरे असल्यास मोदींनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
यानंतर 'काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न आहे. शिमला करार आणि लाहोरची घोषणा ही दोन्ही देशांमधील प्रश्न सोडवण्याची महत्वाचे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींनी अशा प्रकारची कोणतीही विचारणा ट्रम्प यांना केलेली नाही,' असे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्रम्प यांनी दिले. मात्र, विरोधकांनी मोदींनीच यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.
इम्रान खान सध्या अमेरिका भेटीवर आहेत. त्यांनी काश्मीर मुद्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती केल्याचे सांगितले. हा मुद्दा सोडवण्यासाठी मी काही मदत करु शकत असेन तर नक्कीच मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
-
US President Donald Trump says PM Narendra Modi has also asked him to help with "disputed Kashmir" region, he would "love to be a mediator": Reuters pic.twitter.com/PcE7dnq4rr
— ANI (@ANI) July 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">US President Donald Trump says PM Narendra Modi has also asked him to help with "disputed Kashmir" region, he would "love to be a mediator": Reuters pic.twitter.com/PcE7dnq4rr
— ANI (@ANI) July 22, 2019US President Donald Trump says PM Narendra Modi has also asked him to help with "disputed Kashmir" region, he would "love to be a mediator": Reuters pic.twitter.com/PcE7dnq4rr
— ANI (@ANI) July 22, 2019