ETV Bharat / international

चीली : हिंसाचारातील बळींची संख्या अकरावर - चीली हिंसाचारात ११ बळी

चीलीत सार्वजनिक वाहतुकीच्या दर वाढीवरून उफाळलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या ११ झाली आहे. शहरात आणीबाणी घोषित केली असून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत.

हिंसाचारातील बळींची संख्या अकरावर
author img

By

Published : Oct 22, 2019, 8:29 AM IST

सँटियागो - चीलीत सार्वजनिक वाहतुकीच्या दर वाढीवरून उफाळलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या ११ झाली आहे. रविवारी सँटियागो शहरातील सुपरमार्केटला लावलेल्या आगीत ८ लोकांचा मृत्यू झाला.

मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर मार्ग काढण्यासाठी सरकारच्यावतीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, समाजकंटकांनी जनतेच्या मनात कालवलेले विष काढण्यासाठी वेळ लागेल. शांतता प्रस्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष सेबेस्टियन पिनेरा यांनी दिली.

दरम्यान, शहरात आणीबाणी घोषित केली असून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. हिंसाचाराचा परिणाम चीलीच्या विमानवाहतूक सेवेवरही झाला आहे. 'लाटम एअरलाईन्स'ने २०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली आहेत.

Intro:Body:

https://www.aninews.in/news/world/others/death-toll-rises-to-11-after-weekend-of-violent-protests-in-chile20191022070523/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.