ETV Bharat / international

अमेरिकेत 11 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू; 16 बाधित

author img

By

Published : Apr 9, 2020, 2:10 PM IST

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या 11 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संसर्गाला बळी पडलेले सर्व भारतीय पुरुष आहेत.

अमेरिकेत 11 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू...

वॉशिंग्टन - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून सद्य परिस्थितीला सर्वांत जास्त कोरोनाबाधित अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या 11 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

प्राणघातक संसर्गाला बळी पडलेले सर्व भारतीय पुरुष आहेत. 11 पैकी 10 जण हे न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी भागातील आहेत. बळी पडलेल्यांपैकी चार जण न्यूयॉर्क शहरात टॅक्सी चालकाचे काम करत होते. तर फ्लोरिडामध्ये कोरोनाविषाणूमुळे एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, 16 भारतीयांना कोरोनाची लागण झाली असून त्यात 4 महिला आहेत. यातील 8 जण न्यूयॉर्क, 3 जण न्यूजर्सी आणि उर्वरित टेक्सास आणि कॅलिफोर्निया सारख्या इतर राज्यांतील आहेत. ही सर्व जण विलगीकरणामध्ये आहेत. तर कोरोना प्रभावित भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक मदत पुरविण्यासाठी अमेरिकेमधील भारतीय दूतावास कार्य करत आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 6 हजार जणांचा बळी गेला आहे. तर 1 लाख 38 हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच न्यूजर्सीमध्ये 1 हजार 500 जणांचा मृत्यू झाला असून 48 हजार कोरोनाबाधित आहेत. तर संपूर्ण अमेरिकेमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या 4 लाख 35 हजार 128, तर 14 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.