ETV Bharat / entertainment

सुपरस्टार रजनीकांत यांनी तिरुमला मंदिरात केली प्रार्थना

सुपरस्टार रजनीकांत यांनी गुरुवारी येथील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना केली. यावेळी मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत रजनीकांत दर्शनासाठी आले होते. मंदिरामध्ये पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध विधी केले.

रजनीकांत यांनी तिरुमला मंदिरात केली प्रार्थना

author img

By

Published : Dec 15, 2022, 10:56 AM IST

तिरुपती - सुपरस्टार रजनीकांत यांनी गुरुवारी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना केली. मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत रजनीकांत दर्शनासाठी आले होते. मंदिरामध्ये पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध विधी केले. नंतर त्यांना रंगनायकुला मंडपम येथे वेद आशिर्वाचनम् अर्पण करण्यात आले.

पहाडी मंदिराचे कामकाज सांभाळत असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या अधिकार्‍यांनी, रजनीकांत आणि ऐश्वर्या यांचे मंदिराच्या मुख्य गेटवर आगमन झाल्यावर स्वागत केले.

बुधवारी वडील-मुलगी हे दोघे मंदिरात दाखल झाले होते आणि रात्रीच्या मुक्कामानंतर पहाटे दर्शन घेतले. रजनीकांत यांनी ७२ वर्षांचे झाल्यानंतर तीन दिवसांनी मंदिराला भेट दिली. त्यांच्या मुलीसह मंदिरात गेल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

नंतर सुपरस्टार कडप्पा येथील पेड्डा दर्गाला भेट देणार आहे. रजनीकांत आपल्या मुलीसह, आमीन पीर दर्ग्यात प्रार्थना करतील, ज्याला पेड्डा दर्गा म्हणूनही ओळखले जाते.

कामाच्या आघाडीवर, रजनीकांत सध्या नेल्सन दिलीपकुमारच्या 'जेलर' या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. 2023 च्या पूर्वार्धात हा चित्रपट पडद्यावर येण्याची शक्यता आहे. त्याची मुलगी ऐश्वर्याचा आगामी चित्रपट लाल सलाम मध्येही रजनीकांत एक छोटी भूमिका साकारत आहे.

अन्नत्थे (२०२१)चित्रपटामध्ये शेवटचे दिसलेले रजनीकांत यांनी अलीकडेच लायका प्रॉडक्शनसोबत दोन चित्रपटांचा करार केला. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सिबी चक्रवती किंवा देसिंग पेरियासामी असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - देवोलिनाने चाहत्यांना गुंगारा देत जिम ट्रेनर शाहनवाजसोबत केले लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.