मुंबई: 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहेगलने नुकतेच तिचा दीर्घकाळाचा प्रियकर आशिष सजनानीसोबत लग्न केले आहे. सोनालीने अचानकपणे आणि गुपचूप लग्न आयोजित केले होते, मात्र या कार्यक्रमात तिने तिच्या खास सेलिब्रिटी मित्रांना आमंत्रित केले होते. सोनाली तिच्या लग्नात खूपच सुंदर दिसत होती. लग्नासाठी सोनालीने लेहेंगा नाही तर साडीची निवड केली होती. तसेच लग्नानंतरही सोनाली पूर्वीप्रमाणेच सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आता सोनाली सहेगल लग्नानंतर पती आशिष सजनानीसोबत हनीमूनसाठी मालदीवमध्ये येथे गेली आहे. तसेच तिने सोशल मीडियावर हनिमूनचे फोटोही शेअर केले आहेत.

सोनाली सहेगल : मालदीवमधील फोटोमध्ये सोनाली पतीसोबत खूप दिसत आहे. ही फोटो शेअर करून सोनालीने सांगितले की, ती तिच्या पतीसोबत मालदीवच्या अॅटमोसस्पियर कानिफुशीमध्ये आहे.
सोनाली सहेगलचे दाखवली बेडरूम : सोनाली एका सुंदर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर आशिषनेही तिच्या ड्रेससोबत मॅच होणार शर्ट घातला आहे. फोटोमध्ये सोनाली फार जबरदस्त दिसत आहे. इतकंच नाही तर सोनाली ज्या खोलीत राहते आहे त्याची झलकही दाखवण्यात आली आहे. सोनालीने तिच्या चाहत्यांना बेडरूमची झलकही दाखवली आहे, ज्यावर या रिसॉर्टचे नाव अॅटमोसस्पियर कानिफुशी ( Atmosphere Kanifushi) असे लिहिले आहे.

सोनाली सहेगलचे जेवण : सोनालीने एका व्हिडीओच्या माध्यमातून इथल्या खाद्यपदार्थात काय मिळते ते दाखवून दिले आहे. या फोटोमध्ये सोनाली खूप आनंदी दिसत आहे आणि पतीसोबत हे खास क्षण एन्जॉय करत असल्याचे कळत आहे. दरम्यान, सोनालीचे चाहते तिला शुभेच्छाही पाठवत आहेत आणि तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगत आहेत. ७ जून रोजी सोनालीने बॉयफ्रेंड आशिषसोबत सात फेरे घेतले होते आणि त्यानंतर तिने तिच्या खास मित्रांना लग्नाच्या रिसेप्शनला आमंत्रित केले होते. सोनालीच्या लग्नात अनेक बॉलिवूड स्टार आले होते.

या चित्रपटांमध्ये दिसली आहे : सोनाली गेल्या १२ वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. मात्र, त्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलेले नाही. २०११ मध्ये तिने प्यार का पंचनामा या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती वेडिंग पुलाव, प्यार का पंचनामा २, जय मम्मी दी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सोनाली लवकरच नूरानी चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नुपूर सेनन मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा :