ETV Bharat / entertainment

srk fulfills cancer patient wish : शाहरुख खानने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा, मुलीच्या लग्नाला हजर राहण्याचे दिले आश्वासन

author img

By

Published : May 23, 2023, 4:59 PM IST

कॅन्सरच्या उपचार घेणाऱ्या शिवानी चक्रवर्ती हिने शाहरुख खानला भेटण्याची अखेरची इच्छा असल्याचे म्हटले होते. तसा व्हिडिओ तिने शाहरुख व त्याच्या टीमला टॅग केला होता. याला तातडीने उत्तर देताना शाहरुखने व्हिडिओ कॉलद्वारे तिच्याशी संवाद साधला व आर्थिक मदतीचे आश्वासनही दिले.

Shah Rukh Khan fulfills terminal cancer patients last wish
कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा खूप मोठा निष्ठावंत चाहतावर्ग आहे. त्याच्या वाढदिवसाच्या आणि ईदच्या दिवशी, त्याच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानाबाहेर चाहत्यांचा सागर पाहायला मिळतो. वर्षानुवर्षे ही मंडळी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तासंतास ताटकळत उभी असतात. शहारुखलाही आपल्यावर प्रेम करणाऱ्या या लोकांसाठी कसे प्रेम जतन करायचे गे चांगलेच ठावूक आहे. अलिकडेच शाहरुख खान आपल्या कोलकात्यांतील एका चाहत्याशी संपर्क साधला. शाहरुखचा हा चाहती गेली अनेक वर्षांपासून टर्मिनल कॅन्सरशी झुंज देत आहे.

शाहरुखला भेटण्याची कॅन्सरग्रस्त शिवानी चक्रवर्तीची अखेरची इच्छा - अलीकडेच कोलकाता येथील आई आणि मुलगी जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. क्लिपमध्ये शिवानी चक्रवर्ती नावाच्या कॅन्सर रुग्णाने किंग खानला भेटण्याची तिची शेवटची इच्छा असल्याचे व्यक्त केले. शिवानीची मुलगी प्रिया चक्रवर्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि ट्विटरवर शाहरुखला आणि त्याच्या टीमला टॅगही केले आहे. प्रियाच्या ट्विटवर जेव्हा किंग खानला हा व्हिडिओ आढळला तेव्हा त्याने शिवानीला व्हिडिओ कॉल करून तिची शेवटची इच्छा पूर्ण केली.

Hi, I’m Priya from Kolkata, My Mummy is Last Stage Cancer Patient, I'm Requesting Everyone Please Help my Mummy to Meet @iamsrk Sir, I Don't Know How Much Time She Have, Please help her to Fulfill her Last Wish. 🙏@RedChilliesEnt @pooja_dadlani @KarunaBadwal @MeerFoundation pic.twitter.com/h3TuCwDOlw

— Priya Chakraborty, প্রিয়া চক্রবর্তী (@SRKsRouter1) May 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुखने दिले आर्थिक मदतीचे आश्वासन - शिवानीसोबतच्या संभाषणात पठाण स्टार शाहरुखने आर्थिक मदतीचे आश्वासनही दिले. शाहरुख खान आपल्या चाहत्यांना खास अनुभव देण्यासाठी ओळखला जातो, त्याने वचन दिले की तो आजारी चाहतीच्या मुलीच्या लग्नाला तो उपस्थित असेल. सुपरस्टारने शिवानीशी अर्ध्या तासाहून अधिक काळ व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली आणि पुढील कोलकाता भेटीत त्याच्यासाठी मासे शिजवण्याची विनंती केली.

सुपरस्टार शाहरुख खानचे आगामी चित्रपट - दरम्यान, वर्क फ्रंटवर, किंग खान पुढे अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित जवान या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याकडे राजकुमार हिरानी यांचे सोशल कॉमेडी ड्रामा डंकीही येत आहे. दरम्यान, तो सलमान खानच्या टायगर 3 मध्ये पठाणच्या भूमिकेत परतणार आहे जो यशराज फिल्मच्या जासूस विश्वाचा भाग आहे. या तीनही चित्रपटाची प्रतीक्षा शाहरुखचे चाहते करत आहेत.

हेही वाचा - Hollywood Entry : राम चरण हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार ; 'आरआरआर' स्टारने दिला हा मोठा इशारा

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा खूप मोठा निष्ठावंत चाहतावर्ग आहे. त्याच्या वाढदिवसाच्या आणि ईदच्या दिवशी, त्याच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानाबाहेर चाहत्यांचा सागर पाहायला मिळतो. वर्षानुवर्षे ही मंडळी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तासंतास ताटकळत उभी असतात. शहारुखलाही आपल्यावर प्रेम करणाऱ्या या लोकांसाठी कसे प्रेम जतन करायचे गे चांगलेच ठावूक आहे. अलिकडेच शाहरुख खान आपल्या कोलकात्यांतील एका चाहत्याशी संपर्क साधला. शाहरुखचा हा चाहती गेली अनेक वर्षांपासून टर्मिनल कॅन्सरशी झुंज देत आहे.

शाहरुखला भेटण्याची कॅन्सरग्रस्त शिवानी चक्रवर्तीची अखेरची इच्छा - अलीकडेच कोलकाता येथील आई आणि मुलगी जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. क्लिपमध्ये शिवानी चक्रवर्ती नावाच्या कॅन्सर रुग्णाने किंग खानला भेटण्याची तिची शेवटची इच्छा असल्याचे व्यक्त केले. शिवानीची मुलगी प्रिया चक्रवर्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि ट्विटरवर शाहरुखला आणि त्याच्या टीमला टॅगही केले आहे. प्रियाच्या ट्विटवर जेव्हा किंग खानला हा व्हिडिओ आढळला तेव्हा त्याने शिवानीला व्हिडिओ कॉल करून तिची शेवटची इच्छा पूर्ण केली.

शाहरुखने दिले आर्थिक मदतीचे आश्वासन - शिवानीसोबतच्या संभाषणात पठाण स्टार शाहरुखने आर्थिक मदतीचे आश्वासनही दिले. शाहरुख खान आपल्या चाहत्यांना खास अनुभव देण्यासाठी ओळखला जातो, त्याने वचन दिले की तो आजारी चाहतीच्या मुलीच्या लग्नाला तो उपस्थित असेल. सुपरस्टारने शिवानीशी अर्ध्या तासाहून अधिक काळ व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली आणि पुढील कोलकाता भेटीत त्याच्यासाठी मासे शिजवण्याची विनंती केली.

सुपरस्टार शाहरुख खानचे आगामी चित्रपट - दरम्यान, वर्क फ्रंटवर, किंग खान पुढे अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित जवान या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याकडे राजकुमार हिरानी यांचे सोशल कॉमेडी ड्रामा डंकीही येत आहे. दरम्यान, तो सलमान खानच्या टायगर 3 मध्ये पठाणच्या भूमिकेत परतणार आहे जो यशराज फिल्मच्या जासूस विश्वाचा भाग आहे. या तीनही चित्रपटाची प्रतीक्षा शाहरुखचे चाहते करत आहेत.

हेही वाचा - Hollywood Entry : राम चरण हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार ; 'आरआरआर' स्टारने दिला हा मोठा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.