हैदराबाद: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केलेली प्रियांका चोप्रा नुकतीच 'सिटाडेल'मध्ये दिसली. आता ती तिच्या आगामी 'लव्ह अगेन' या नवीन चित्रपटासाठी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ज्याचे ती सतत प्रमोशन करत आहे. आता प्रियांकाने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला की ती नुकतीच न्यूयॉर्कमध्ये तिच्या 'लव्ह अगेन' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान कोसळली होती. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबूल केले की ती तिच्या उंच टाचेच्या हिल्समुळे रेड कार्पेटवर पडली. पापाराझींसमोर कोसळली तेव्हा तिला 'अपमानित' झाल्यासारखे वाटले, परंतु कोणत्याही फोटोग्राफरने ही घटना कॅप्चर केली नाही याचा तिला धक्का बसला.
प्रियांका चोप्राने केले पापाराझींचे कौतुक : तिने सांगितले की, 'मी याबद्दल बोललो नाही कारण मी दररोज सोशल मीडियावर अशा गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करते,' तिने स्पष्ट केले. 'पण मी ड्रेसच्या खाली उंच टाचेची हिल्स घातली होती जेणेकरून मी उंच दिसावं. मी रेड कार्पेटवर, माझ्या हिल्समुळे खाली पडले.' यानंतर झालेल्या प्रसंगाने तिला आश्चर्य वाटले. उपस्थित प्रत्येकाने आपले कॅमेरे बंद केले, जे तिने तिच्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कधीही पाहिले नव्हते. प्रियांका म्हणाली की पापाराझींनी तिला काळजी करू नका आणि वेळ घेण्यास सांगितले. 'मला क्षणभर लाज वाटली', मात्र तिथे उपस्थित असणाऱ्यांना फोटोग्राफरला असे करताना पाहिले. ती पुढे म्हणाली, 'तुम्ही नेहमीच खूप छान आहात, आम्हाला हे समजते आणि त्यानंतर मी उभी राहिले.
मदतीला धावला पती निक जोनास : पुढे तिने सांगितले की, 'मी पडल्याचा कुठल्याही ठिकाणी व्हिडिओ नाही, तसेच प्रियंका पडल्यानंतर तिचा पती निक जोनाससह पाच जण तिला मदत करायला समोर आले. प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायच तर, अलीकडेच ती रुसो ब्रदर्सच्या वेब सीरिज 'सिटाडेल' मध्ये रिचर्ड मॅडन सोबत दिसली होती, ज्यामध्ये ती दमदार अॅक्शन भूमिकेत दिसला होती. आता ती 'लव्ह अगेन' मधून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. यासोबतच ती फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबत रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.
हेही वाचा: Aryan Khan Case : आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकारी बडतर्फ, वर्षभरापासून होता निलंबित