हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर 10 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा करत आहेत. शुक्रवारी, या जोडप्याने आपापल्या इंस्टाग्राम हँडलवर एकमेकांसाठी मनापासून पोस्ट लिहिल्या आहेत. नम्रता आणि महेशच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या या पोस्ट चाहत्यांसाठी एक मेजवानी घेऊन येतात कारण दोघांनी एकमेकांसोबत सुंदर थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. दोघांचेही चाहते कमेंट सेक्शनमध्ये दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नम्रतासोबतचा एक फोटो शेअर करत महेश बाबूने लिहिले, आम्ही... थोडे वेडे आणि भरपूर प्रेमाने भरलेले आहोत! 18 वर्षे झाली एकत्र राहात आहोत आणि सदैव एकत्र राहणार आहोत. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नम्रता!!, अशी पोस्ट महेश बाबूने लिहिल्यानंतर लगचच नम्रतानेही त्याला प्रतिसाद दिला. तिने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'आणि मी पण तुझ्यावर प्रेम करते..'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दुसरीकडे, नम्रताने कॅमेरात कैद केलेला एक दुर्मिळ रोमँटिक क्षण पोस्ट केला आहे. रोमँटिक थ्रोबॅक पिक्चर शेअर करताना नम्रताने लिहिले, 'आम्ही घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयाची 18 वर्षे साजरी करत आहोत, महेश बाबू वाढदिवसाच्या शुभेच्छा.'
महेश बाबूला बॉलिवूड परवडत नाही - महेश बाबू हा तेलुगु सुपरस्टार असून दक्षिण भारतात त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. तो साऊथच्या चित्रपटातच रमला आहे. सध्या पॅन इंडिया चित्रपट बनत आहेत. त्यामध्ये पुष्पा, आरआरआर, केजीएफ, कंतारा, विक्रम अशा चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमवत आहेत. हिंदी भाषिक प्रेक्षकही या चित्रपटांचे दिवाने झाले आहेत. अशावेळी महेश बाबूला तो बॉलिवूड चित्रपट करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी महेश बाबू म्हणाला होती की, बॉलिवुड त्याला परवडत नाही. या त्याच्या विधानानंतर बरीच चर्चा रंगली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नम्रता आणि महेश बाबू 2000 मध्ये त्यांच्या वामसी चित्रपटाच्या मुहूर्तावर एकमेकांना पहिल्यांदा भेटले आणि काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगा गौतम घट्टमनेनी आणि मुलगी सितारा घट्टमनेनी.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नम्रता ही आपल्या ताकदीचा आधारस्तंभ आहे, हे जीवनातील सूत्र महेश बाबूंनी कायम ठेवले आहे. अनेक प्रसंगी महेश म्हणाले की नम्रता हीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेते जेणेकरून तो आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकेल. माझी पत्नी, नम्रता, मला जमिनीवर ठेवते. घरी मी फक्त तिचा नवरा आहे आणि माझ्या मुलांचा बाप आहे, असे सुपरस्टार महेश बाबूने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते.
हेही वाचा - Vishal Bhardwaj's Fursat : 'फुरसत'साठी ईशान खट्टर, वामिका गब्बीने काळाचे भान हरपून केला नृत्याचा सराव