ETV Bharat / entertainment

Satyaprem ki katha : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल कार्तिकने प्रेक्षकांचे मानले आभार

'सत्यप्रेम की कथा'ला प्रेम दिल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या चित्रपटाने चार दिवसांत 38.5 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Satyaprem ki katha
सत्यप्रेम की कथा
author img

By

Published : Jul 3, 2023, 5:29 PM IST

मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी 12.15 कोटींचा व्यवसाय केला, त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 38.5 कोटींवर पोहोचली आहे. या अभूतपूर्व यशानंतर कार्तिक आर्यनने चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

चित्रपटाची एकूण कमाई : कार्तिक आर्यनने सोमवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या चित्रपटाच्या पोस्टरसह एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने कॅप्शन लिहिले आहे की, 'प्रेम जितके मिळते तितके कमी असते आणि जेव्हा संपूर्ण प्रेम कुटुंबाचे मिळते, तेव्हा ही बाब विशेष बनते. आमच्या 'सत्य प्रेम की कथा'ला तुमच्या कुटुंबाचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद. पोस्टरवर कार्तिक आर्यन आणि कियारा यांच्या पोझसह चित्रपटाने केलेली चार दिवसांची एकूण कमाई 38.5 कोटी टाकण्यात आली आहे.

प्रेक्षकांचा उस्फुर्तपणे प्रतिसाद : गेल्या रविवारी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला प्रेक्षकांची उस्फुर्तपणे दाद मिळाली. कार्तिक आर्यनने हा खास क्षण त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हे शेअर करताना त्याने कॅप्शन दिले आहे की, 'हे स्टँडिंग ओव्हेशन फक्त सत्तू आणि कथासाठी नाही तर संपूर्ण टीमसाठी आहे ज्यांनी या रिजल्टसाठी खूप मेहनत केली आहे.' व्हिडिओमध्ये कार्तिकसोबत कियाराही दिसत आहे. दरम्यान यावेळी कार्तिक आर्यनने उभे राहून उपस्थितांचे हात जोडून आभार मानले.

बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे चित्रपट : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' रिलीजच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये उडी मारताना दिसत आहे. रविवारी या चित्रपटाने 12 कोटींहून अधिक कमाई केली असून त्याचे एकूण कलेक्शन 38 कोटींहून अधिक झाले आहे. चित्रपटाचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक कलेक्शन आहे. हा चित्रपट 100 कोटीचा आकडा लवकरच पार करणार असे दिसत आहे कारण या चित्रपटाला प्रेक्षकाद्वारे फार पसंत केल्या जात आहे. याशिवाय या चित्रपटाचे गाणे देखील फार जास्त हिट झाल्यामुळे अनेक प्रेक्षक गाणे बघण्यासाठी देखील चित्रपट बघायला जात आहे.

हेही वाचा :

  1. SPKK box office collection day 4: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकुळ...
  2. Animal New Release Date: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची नवीन रिलीज तारीख जाहीर
  3. ZHZB collection day 30 : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कमाईच्याबाबतीत मागे पडला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.