ETV Bharat / entertainment

Gadar 2 box office Collection Day 2 : 'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; सनी देओलच्या सिनेमाची आजवरची सर्वात मोठी कमाई

author img

By

Published : Aug 13, 2023, 12:15 PM IST

सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींहून अधिक कमाई केली, तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली असेल हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Gadar 2
गदर २

मुंबई : 'गदर २' बॉक्स ऑफिसवर सध्या जोरदार कमाई करत आहे. दमदार ओपनिंगनंतर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटात सनी देओलची जुनी शैली आणि आधीची गाणे नव्या अंदाजात मांडण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट अधिक मनोरंजक बनला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित आणि सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा अभिनीत 'गदर २' हा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गदर: एक प्रेम कथा' चा सीक्वल आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींहून अधिक कमाई केली.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई : या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४०.१० कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सनी देओलच्या चित्रपटाने आणखीनच धमाकेदार कमाई केली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'गदर २'चा सुनामी आला आहे, असे म्हणता येईल. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४३ ते ४५ कोटींचा गल्ला जमवला. यानुसार सनी देओल, अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने दोन दिवसांत अंदाजे एकूण ८३.१० कोटींची कमाई केली आहे.

या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट : 'गदर २' हा सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ठरला आहे. शाहरुख खानचा 'पठाण' पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात ५५ कोटींची ओपनिंग केली होती. 'गदर २' ने गदर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेक ठिकाणी लोक थिएटरमध्ये गाण्यांवर नाचू लागले आहे. तर 'गदर २' चे सिग्नेचर डायलॉग ऐकून सिनेमा हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत आहे.

आगाऊ बुकिंग करूनच इतिहास रचला गेला : सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट 'गदर २' या चित्रपटाची आगाऊ बुकिंग खूप जास्त होत आहे. १० ऑगस्टपर्यंत चित्रपटाची १० लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली होती. ट्रेड एक्स्पोर्टचा अंदाज होता की हा चित्रपट २० ते २२ कोटींची ओपनिंग करू शकतो, मात्र या चित्रपटाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

हेही वाचा :

  1. Suhana Khans kind gesture : सुहाना खानच्या दातृत्वाने जिंकली अनेकांची मने - पाहा व्हिडिओ
  2. Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटीतून बाहेर पडल्यानंतरही जिया शंकरचे अभिषेक मल्हानवरील प्रेम कायम
  3. IFFM 2023 : करण जोहरची बॉलिवूडमध्ये २५ वर्षे, योगदानाबद्दल मेलबोर्न फेस्टीव्हलमध्ये सन्मान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.