ETV Bharat / entertainment

धर्मेंद्रने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, सनी बॉबीसह 'ड्रीम गर्ल'नेही दिल्या शुभेच्छा - धर्मेंद्र वाढदिवस साजरा

Dharmendra celebrates birthday with fans : वाढदिवसानिमित्त धर्मेंद्र यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. मुंबईतील त्यांच्या घराबाहेर या खास दिवशी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांसह त्यांनी केक कापला आणि त्यांना अभिवादन केलं.

Dharmendra celebrates birthday with fans
धर्मेंद्रने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 4:06 PM IST

मुंबई - Dharmendra celebrates birthday with fans : ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी त्यांचा ८८वा वाढदिवस कुटुंबीयांसह मुंबईतील घरी साजरा केला. आज सकाळपासून त्यांच्यावर वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसानिमित्त मुंबईतील घराबाहेर जमलेल्या चाहत्यांनाही धर्मेंद्र यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांना अभिवादन केले.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मेंद्र यांनी त्यांचा मुलगा सनी देओलसोबत त्यांच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांसोबत आणि पापाराझींसोबत केक कापला. तपकिरी शर्ट आणि टोपीसह काळ्या पँटमध्ये धर्मेंद्र नेहमी प्रमाणेच स्मार्ट दिसत होते. चाहते त्यांचे फोटो काढत असताना त्यांनी शुभचिंतकांना भेटून त्यांच्या प्रती असलेलं प्रेम दाखवून दिलं.

धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सनी देओलने वडिलांचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोंमध्ये धर्मेंद्र आणि सनी दोघेही हसताना दिसते होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सनीने लिहिले, "हॅपी बर्थडे पापा लव्ह यू."

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असलेल्या बॉबी देओलनेही सोशल मीडियावर आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली, त्यांना मिठी मारताना आणि चुंबन घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

अभय देओल आणि ईशा देओल या सारख्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे पोर्ट्रेट आणि गोड क्षण शेअर केले आणि त्यांच्या खास दिवशी धर्मेंद्रबद्दल असलेले त्यांचे प्रेम व्यक्त केले. ईशानं आपल्या शुभेच्छा देताना 'डार्लिंग पप्पा' म्हणते शुभेच्छा दिल्या आहेत.

धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दोघांचा एक छान फोटो शेअर केला आणि लिहिले, "माझ्या कित्येक वर्षांच्या जिवलग जोडीदाराला, खूप आनंदी, निरोगी आणि आनंददायी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या अंतःकरणातलं सर्व प्रेम, एक दिवस सर्व आनंद आणू शकेल आणि जीवनात सर्व आशीर्वाद मिळू शकतील. मला फक्त इतकंच सांगायचे आहे की, तुम्ही माझ्यासाठी किती खास आहात हे तुम्ही पाहू शकता. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

हेही वाचा -

  1. धर्मेंद्रना 'डार्लिंग पापा' म्हणत, ईशा देओलनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर'चा टीझर अखेर लॉन्च
  3. झोया अख्तरच्या डिनर पार्टीत सुहाना, अगस्त्य आणि खुशी कपूरसह 'द आर्चिज' गँगची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.