ठाणे - शहापूर तालुक्यातील वाशिंद परिसरात असलेल्या जिदाल कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आज भर उन्हात बेरोजगार संघर्ष सेनेच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे बेरोजगार संघर्ष सेनेने मोर्चा काढू नये म्हणून कंपनी व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाकडून दाबण्याचा प्रयत्न केले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. असे असतानाच शहापूर न्यायालयाने देखील जिंदाल कंपनीच्या ३०० मिटर परिसरात आंदोलन, मोर्चे, घोषणा, करण्यास मनाई केली. त्यामुळे मोर्च्याकर्त्यांनी वाशिंद बाजारपेठेत ठिया आंदोलन केल्याने बाजारपेठेतील वहातूक ठप्प झाली.
बाजारपेठ ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प - शहापूर तालुक्यातील बेरोजगार संघर्ष सेनेच्यावतीने आज स्थानिक बेरोजगार भुमीपूत्रांच्या न्याय हक्कासाठी जेएसडब्लयू (जिंदाल) कंपनी विरोधात आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात शेकडोच्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा वाशिंद रेल्वे स्थानकापासून काढण्यात आला. मोर्चाचे आयोजकांनी कंपनीत ८० टक्के कामगार स्थानिक भूमिपुत्रांना कामावर घेणे तसेच जी कामगार गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. त्यांना कंपनीच्या सेवेत कायमस्वरूपी घेण्यात यावे, अश्या प्रमुख मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे जोपर्यत जिल्हा प्रशासन मोर्च्याच्या ठिकाणी येऊन मागण्यांविषयी चर्चा करत नाही. तोपर्यत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलनर्कत्यांनी घेतला. त्यामुळे भर उन्हात मोर्चेकरांनी वाशिंद बाजारपेठ ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - Kalaburagi Accident : बस आणि लॉरीमध्ये भीषण धडक, बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू