ठाणे - नौपाडा पोलीस ठाणे आणि ठाणे पोलीस ठाणे यांच्या वतीने रेझींग डे सप्ताहाच्या अनुषंगाने ठाणे शहरात कोरोनाबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आले. नाट्य-सिने दिग्दर्शक किरण नाकती यांच्या पुढाकाराने दोन ठिकाणी पथनाट्ये सादर करुन कोरोनाबाबतच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्र पोलिसांच्या रेझींग डे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार अनुक्रमे जांभळी नाका आणि तलावपाली, चिंतामणी चौक येथे पथनाट्याचे आयोजन केले होते.


किरण नाकती यांचे दिग्दर्शन
या पथनाट्याचे दिग्दर्शन किरण नाकती यांनी केले होते. किरण नाकती यांचा मराठी सिनेमा सिंड्रेला हा खूप गाजला होता. त्यांचा सहभाग ठाण्यात अनेक सामाजिक उपक्रमात असतो. यावेळी पथनाट्याद्वारे कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.