ETV Bharat / city

कल्याणमध्ये थरार! लिफ्टमध्ये अडकलेल्या 65 वर्षीय आजीबाई सुखरूप - अग्निशमन दल ठाणे

अर्ध्यातासाच्या अथक प्रयत्नानंतर कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी आजीबाईची सुखरूप सुटका केली.

लिफ्टमध्ये अडकलेल्या 65 वर्षीय आजीबाई सुखरूप

author img

By

Published : Jan 3, 2021, 4:57 PM IST

Updated : Jan 3, 2021, 5:21 PM IST

ठाणे - नशीब बलवत्तर म्हणून लिफ्टमध्ये अडकलेल्या 65 वर्षीय आजीबाई सुखरूप बचावल्या आहेत. विशेष म्हणजे अर्ध्यातासाच्या अथक प्रयत्नानंतर कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी आजीबाईची सुखरूप सुटका केली. ही घटना कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील वोलगा नावाच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये घडली आहे.

लिफ्टमध्ये अडकलेल्या 65 वर्षीय आजीबाई सुखरूप
लिफ्टचे दरवाजेही काही केल्या उघडत नव्हते-

कल्याण पश्चिम परिसरात पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील इमारतीची लिप्ट अचानक बंद पडली. त्यामध्ये एक 65 वर्षीय आजीबाई अडकून पडल्या होत्या. विशेष म्हणजे आजीबाई लिफ्टमध्ये गेली आणि अचानक लिफ्ट बंद झाली होती. आजीबाई लिफ्टमध्ये अडकल्याचे समजताच सोसायटीतील रहिवाशांनी लिफ्ट सुरू करण्याचे आणि या महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न निष्फळ ठरले. विशेष म्हणजे या लिफ्टचे दरवाजेही काही केल्या उघडत नव्हते.

रहिवाशांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष-

अखेर रहिवाशांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानूसार अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे आणि लिडिंग फायरमन संतोष मोरे, निलेश आडेकर, राहुल भाकरे आदींच्या पथकाने या महिलेची सुखरुप सुटका केली. लिफ्टचा दरवाजा उघडून ही महिला बाहेर आली असता रहिवाशांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला आणि अग्निशमन दलाचे आभार मानले.

हेही वाचा- उत्तर प्रदेश : गाझियाबादमध्ये भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू

हेही वाचा-..तर २६ जानेवारीला दिल्लीमध्ये 'ट्रॅक्टर परेड' होईल; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा इशारा

Last Updated : Jan 3, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.