ETV Bharat / city

Kedar Dighe : ठाण्याची सूत्र पुन्हा 'दिघें'कडेच; शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख पदी केदार दिघेंची निवड

author img

By

Published : Jul 31, 2022, 10:44 PM IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Shivsena Chief Uddhav thackeray )ठाणे जिल्हाप्रमुखपदी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र विनायक राऊत यांनी प्रसिद्ध केलं ( kedar dighe shivsena thane chief ) आहे.

Kedar Dighe
Kedar Dighe

ठाणे - शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदासह अन्य पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. मात्र, अनेक दिवस कोणाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या नव्हत्या. अखेर, आज मुहूर्त सापडल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Shivsena Chief Uddhav thackeray ) ठाणे जिल्हाप्रमुखपदी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची नियुक्ती केली आहे. त्याचसोबत अनिता बिर्जेसह अन्य दोघांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले ( kedar dighe shivsena thane chief ) आहे.

'खासदार राजन विचारे त्यांचा पत्नी वगळता...' - विधान परिषदेच्या धक्कादायक निकालानंतर शिवसेनेत मोठी फूट पडुन राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी सूरत - गुवाहाटी येथे जाऊन वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पहिला राजीनामा दिल्याने मातोश्रीने त्यांची हकालपट्टी केली होती. दरम्यान, शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड होताच खासदार राजन विचारे व त्यांची नगरसेविका पत्नी वगळता ठाण्यातील सर्व नगरसेवक तसेच ठाणे जिल्हातील पदाधिकारी शिंदे गटात आले होते. तेव्हापासून बराच मोठा काळ ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती.

'केदार दिघे जिल्हाप्रमुख तर अनिता बिर्जे...' - अखेर, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच धर्मवीर चित्रपटात उल्लेख झालेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची आणि जुनेजाणते शिवसैनिक चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

कोण आहेत केदार दिघे ? - केदार दिघे हे ठाणे जिल्हा तत्कालीन शिवसेना प्रमुख कै. आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आनंद दिघे साहेब गेल्यानंतर ते ठाणे आणि पालघर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेअंतर्गत असणाऱ्या युवासेनात कार्यरत होते. शिवसेनेच्या बहुतांशी कार्यक्रमात त्यांना बोलावले जात नव्हते. ठाण्यातील शिवसेनेचे काही नेते त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवत होते हे लक्षात आल्याने चार वर्षांपूर्वी त्यांनी युवासेनेचा राजीनामा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करताच केदार दिघे राजकारणात सक्रिय झाले. ते शिवसेना भवनात वेळोवेळी दिसू लागले. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी काढलेल्या शिवसंवाद यात्रेत केदार दिघे आपल्या समर्थकांसह सहभागी झाले होते.

हेही वाचा - Uddhav Thackeray : संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यावर उद्धव ठाकरे संतापले; 'लाज, लज्जा सोडून कटकारस्थान...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.