ETV Bharat / city

Har Ghar Tiranga कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या प्रयत्नाने दोन हजार पाचशे तिरंगा ध्वजांची निर्मिती

author img

By

Published : Aug 13, 2022, 6:27 PM IST

डोंबिवली बदलापूर Dombivli Badlapur अंबरनाथ उल्हासनगर परिसरातील शेकडो कंपन्यांना तिरंगा ध्वज देण्यासाठी कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या Kalyan Ambernath Manufactures Association प्रयत्नाने डोंबिवली औद्योगिक विभागातील एका कापड कंपनीत दोन हजार पाचशे तिरंगा ध्वजांची निर्मिती केली आपणच तयार केलेले तिरंगा ध्वज कंपन्यांच्या प्रवेशद्वार झळकत असल्याने उद्योजकांनी आनंद व्यक्त केलाआहे

tricolor
कंपन्यांवर स्वनिर्मित तिरंगा

ठाणे एक गठ्ठा अडीच हजार तिरंगा ध्वज कोठेही उपलब्ध न झाल्याने डोंबिवली बदलापूर Dombivli Badlapur अंबरनाथ उल्हासनगर परिसरातील शेकडो कंपन्यांना तिरंगा ध्वज देण्यासाठी कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या Kalyan Ambernath Manufactures Association प्रयत्नाने डोंबिवली औद्योगिक विभागातील एका कापड कंपनीत दोन हजार पाचशे तिरंगा ध्वजांची निर्मिती केली. आपणच तयार केलेले तिरंगा ध्वज कंपन्यांच्या प्रवेशद्वार झळकत असल्याने उद्योजकांनी आनंद व्यक्त केलाआहे.

दोन दिवसात अडीच हजार तिरंगा ध्वज तयार कापड उद्योगातील एका व्यावसायिकाने बाराशे मीटर सुती कापड झेंड्यासाठी उपलब्ध करुन दिले. एका कंपनीने दोन बाय तीन आकाराचा तागा कापून देण्यास साहाय्य केले. झेंड्यावरील रंगकाम शिलाई कामे वेगळ्या कंपन्यांनी करुन दिली. दोन दिवसात अडीच हजार तिरंगा ध्वज तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली. कामा संस्थेचे सदस्य असलेल्या सर्व कंपनी चालकांना एकाच वेळी तिरंगा ध्वज देण्याचा निर्णय अध्यक्ष देवेन सोनी यांनी घेतला होता. अनेक शासकीय संस्था शिधावाटप दुकान पालिका कार्यालयांमध्ये एक गठ्ठा अडीच हजार झेंडे मिळण्यासाठी अध्यक्ष सोनी यांनी प्रयत्न केले. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काही झेंडे त्यांना मिळाले पण ते सदोष होते. त्यामुळे कामा संघटनेच्या सदस्यांच्या कंपन्यांवर चांगल्या कापडाचे तिरंगा ध्वज असावेत या विचारातून अध्यक्ष सोनी यांनी डोंबिवलीतील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनी मालकाला तिरंगा ध्वजाला कापड देण्यास सांगितले.

तिरंगा ध्वजाचे कामा संघटनेतर्फे वाटप करण्यात कंपनी मालकाने तातडीने १२०० मीटर सुती उत्तम दर्जाचा कापडाचा तागा कामा संघटनेला उपलब्ध करुन दिला. तातडीने हा तागा तिरंगा ध्वजाचा आकारात कापण्यासाठी एक कताई करणाऱ्या कंपनीला देण्यात आला. या कंपनीतील ध्वज आकारातील सफेद कापडावर ध्वजाचे रंग छापण्यासाठी अन्य एका कंपनीने सहकार्य केले. दोन दिवसाच्या कालावधीत डोंबिवली परिसरातील कंपन्यांना डोंबिवलीतील कंपनीत तयार झालेले उत्तम दर्जाचे तिरंगा ध्वज कामा संघटनेतर्फे वाटप करण्यात आले. झेंडे तयार करणाऱ्या कंपनीचे नाव उघड केले तर त्या मालकाला निवडणूक काळात राजकीय मंडळींच्या झेंडे तयार करण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यांना मूळ उत्पादन सोडून झेंडे तयार करण्याच्या कामाला आपली कामगार यंत्रणा गुंतवावी लागेल या विचाराने तिरंगा निर्मिती करणाऱ्या कापड कंपनी मालकाचे नाव जाहीर केले नाही. असे कामाचे अध्यक्ष देवेने सोनी यांनी सांगितले. अनेक ठिकाणी एक गठ्ठा अडीच हजार झेंडे मिळण्यासाठी प्रयत्न केले ते मिळाले नाहीत. थोडेफार मिळाले ते सदोष होते. त्यामुळे आपण डोंबिवलीतील कापड कंपनीतच तिरंगा ध्वज तयार करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसात अडीच हजार तिरंगा ध्वज तयार करुन ते बदलापूर अंबरनाथ डोंबिवलील कंपनी चालकांना वाटप केले. चांगल्या दर्जाचे झेंडे मिळाल्याने कंपनी चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Har Ghar Tiranga जाणून घ्या ध्वजारोहण करतानाचे नियम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.