ETV Bharat / city

RSS Defemation Case : आरएसएस मानहानी प्रकरणात याचिकाकर्त्यांनाच दंड, राहुल गांधीना एक हजार रुपये देण्याचे आदेश

author img

By

Published : Apr 22, 2022, 6:02 PM IST

भिवंडीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजेश कुंटे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या ( RSS Defemation Case ) दाव्यात खासदार व काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना एक हजार रुपये दंड देण्याचे आदेश भिवंडीतील जलदगती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याचिका याचिकाकर्त्यांना दिले आहे.

RSS Defemation Case
RSS Defemation Case

ठाणे - भिवंडीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजेश कुंटे ( Rajesh Kunte Fined By Court ) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात खासदार व काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना एक हजार रुपये कॉस्ट देण्याचे आदेश मानहानी दावा दाखल करणारे कुंटे यांना भिवंडीतील जलदगती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दिले. याचिकाकर्ते कुंटे यांनी स्थगिती अर्ज दाखल केल्यानंतर हा आदेश आला.

सुनावणीला दुसऱ्यांदा स्थगिती - याचिकाकर्ते कुंटे यांनी दिल्लीहून दुसरा नोटरी साक्षीदार हजर करण्यासाठी अर्ज करण्याची विनंती फेटाळल्यानंतर न्यायालयाने मार्च २०२२मध्ये सुनावणी पुढे ढकलली होती. कुंटे यांनी काँग्रेस नेत्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी दिवसभर सुरू होणार होती. मात्र, (काल) गुरुवारी दुसऱ्यांदा स्थगिती देण्यात आली जलदगती न्यायालयाने याचिकाकर्ते कुंटे यांना एक हजार कॉस्ट भरण्यास सांगितल्याची माहिती वकील नारायण अय्यर यांनी दिली.

१० मे रोजी पुढील सुनावणी - राहुल गांधीचे वकील नारायण अय्यर यांच्याकडे विचारणा केली असता, "याचिकाकर्ते कुंटे यांनी गुरुवारी पुन्हा सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली. परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आणि राहुल गांधींना एक हजार कॉस्ट रक्कम याचिकाकर्ते कुंटे यांनी देण्यास सांगितले. तसेच १० मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीच्या तारखेला पुरावे आणि साक्षीदार सादर करण्याचे आदेश दिले.

२०१८ मध्ये आरोप निश्चित - २०१४ मधील लोकसभा निवडणुकी वेळी भिवंडीतील सोनाळे गावातील मैदानात झालेल्या सभेमध्ये कॉग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधींनी भाषणात महात्मा गांधींची हत्या आरएसएसवाल्याने केल्याचे वक्तव्य करून आरएसएसला जबाबदार धरले होते, त्यानंतर कुंटे यांनी राहुल गांधींवर भिवंडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने २०१८ मध्ये राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित केले होते.

हेही वाचा - Import Coal from Chhattisgarh : राज्य सरकारच्या मदतीला सोनिया गांधी; छत्तीसगड सरकारकडून कोळशाची खाण घेणार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.