ETV Bharat / city

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती खालावली; फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

author img

By

Published : Apr 22, 2020, 1:49 PM IST

प्रकृती खालावल्यामुळे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज सकाळी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत फोर्टिस रुग्णालयाकडून संध्याकाळपर्यंत माहिती दिली जाणार आहे.

Thane
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

ठाणे - प्रकृती अस्वास्थ्यामुळे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज सकाळी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत फोर्टिस रुग्णालयाकडून संध्याकाळपर्यंत माहिती दिली जाणार आहे.

आव्हाड यांच्या प्रकृतीची विचारणा फोर्टिस रुग्णालयात केली असता, रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 'मंत्री जितेंद्र आव्हाड हे आमच्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार हॉस्पिटल करीत आहे,' अशी माहिती दिली. दरम्यानच्या काळात मुंब्रा येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या अनेक सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर होरायझन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फोनवरून जितेंद्र आव्हाड यांची विचारपूस केली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी देखील चौकशी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.