ETV Bharat / city

Female police officer injured : धक्काबुक्कीत जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दखल - उपचारासाठी रुग्णालयात दाखल

बुधवारी मुख्यमंत्री शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी वारी संदर्भात ठाण्यात बैठक बोलावली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक गर्दी उसळल्यामुळे एक महिला पोलीस कर्मचारी जखमी ( Female police officer injured ) झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदे
author img

By

Published : Jul 7, 2022, 10:10 AM IST

ठाणे - आषाढी एकादशीनिमित्त भाविक वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी घेतला आहे. बुधवारी शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या बैठकीत तसे आदेश दिले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मोठी गर्दी झाल्याने एक महिला पोलीस कर्मचारी जखमी ( Female police officer injured ) झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेतली. महिला पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल ( Female police officer hospitalized for treatment ) करण्यात आले.

CM Eknath Shinde pc

मुख्यमंत्र्यांची मानुसकी - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची ओढ लागली आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून भाविक वारकरी पंढरपूरला येत असतात अश्या वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. रविवारी पंढरपूर येथे विठ्ठलाची मोठी यात्रा संपन्न होणार असून वारकरी बांधवांच्या त्या वाहनांना स्टिकर्स वाटप करा असे निर्देश बुधवारी शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मोठी गर्दी ( crowd during meeting) झाल्याने या गर्दीत धक्काबुक्की झाली.यात एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. मुख्यमंत्र्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याची विचारपूस करत महिला पोलीस कर्मचाऱ्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तात्काळ उपचार करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याची विचारपूस देखील केली.

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, त्यांचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी कार्यवाही करण्यात यावी. शासन-प्रशासन आपल्या दारात आले अशी भावना लोकांमध्ये पोहोचायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वीज पुरवठा अखंडित राहण्यासाठी सज्ज रहा - आढावा बैठक सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी परिसरातील वीजपुरवठा हा अखंडित आणि सुरळीत राहील याकडे लक्ष देऊन सज्ज राहण्याचे निर्देश दिले. तसेच लोकांनी फोन केल्यास त्यांना प्रतिसाद मिळेल याची काळजी घ्या. त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची २४ बाय ७ व्यवस्था करा. त्यावर कार्यवाही करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी, यंत्रणांना आवश्यक सुविधा, उपकरणे तातडीने पुरवण्यात यावे असे देखील निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

वारकऱ्यांसाठी सोयी-सुविधा - अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा अशी सूचनाही शिंदे यांनी यावेळी केली. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. अशा सूचनाही केल्या. शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा.रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा. दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करा. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या असे ही म्हटले आहे.

पोलिसांना विशेष सुविधा देण्याचा प्लॅन - आधीही नगरविकास खाते असताना सिडकोत पोलिसांसाठी राखीव कोठा ठेवला होता. आता योगायोगाने राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे पोलिसांसाठी विषेश सुविधा देण्याचा प्लॅन करू असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. पोलीस हे राज्यात कायदा व व्यवस्था राखतात. त्यांना योग्य सुविधा मिळायला हव्यात त्यावर लक्ष देऊ असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Udaipur Murder Case : कन्हैयालाल हत्येवर फेसबुक पोस्ट करणाऱ्या मुंबईतील तरुणीला जीवे मारण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.