ठाणे - सरकारच्या निर्णयानंतर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कडकडीत बंद ठेवण्यात आले. सर्व आस्थापना बंद असल्याकारणाने रस्त्यावर राहणाऱ्या बेघर नागरिकांचे जेवनाचे हाल होत आहेत. ही परिस्थिती पाहून ठाण्यात एका तरुणाने मदतीचा हात पुढे केला आहे. काल ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील गरीब व बेघर नागरिकांना किरण पवार या तरुणाकडून अन्न वाटप करण्यात आले.
हेही वाचा - ठाण्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
किरण पवार हे गेल्या एक वर्षापासून रस्त्यावरील गरीब व बेघर नागरिकांना अन्न पुरवण्याचे काम करीत आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये किरण यांच्या मदतीमुळे अनेक बेघर लोकांना अन्न मिळाले होते व कोविड महामारीमध्ये उपासमार कमी होण्यास मदत झाली होती.
नागरिकांनी मानले आभार
ठाण्यातील रस्त्यावरती बेघर लोकांसाठी सुरू केलेल्या या मदतीमुळे गरीब नागरिकांनी किरण पवार त्यांचे सहकारी व कुटुंबीयांचे आभार मानले असून, अशा प्रकारचे कार्य नेहमी सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे तातडीने पूर्ण करा - पालिका आयुक्त