ETV Bharat / city

ठाण्यात प्लास्टीक बंदीची कारवाई, १ लाख ३५ हजार रुपये दंड वसुली

author img

By

Published : Aug 31, 2019, 10:35 AM IST

Updated : Aug 31, 2019, 10:40 AM IST

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत 2019-20 ठाणे महापालिकेने 1 लाख 35 हजार रूपये दंड वसूल केला. या वर्षात 888 किलो प्लास्टिक आणि थर्माकोल जप्त केले.

ठाण्यात प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत १ लाख ३५ हजार रुपये दंड

ठाणे - प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत 2019-20 अर्थिक वर्षात ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमध्ये 888 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महापालिकेने दंडापोटी १ लाख ३५ हजार रूपये दंड वसूल केला आहे.

महाराष्ट्र सरकारने प्लास्टीक व थर्माकोल या अविघटनशील वस्तुंची ( उत्पादन , वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) याबाबत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या अधिसूचनांच्या अंमलबजावणीकरता ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिबंधीत प्लास्टीक व थर्माकोल वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करणाऱ्या संस्था, आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा - वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे लढवणार निवडणूक, अनिल परब यांचे सुचक वक्तव्य

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने सन 2019-20 या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण 15,548 किलो प्लस्टिक व थर्माकोल वाहनाद्वारे संकलन करण्यात आले. 5049 किलो प्लस्टिक व थर्माकोल आस्थापनाधारकांकडून जप्त करण्यात आले, असून दंडापोटी रु.9,40,200 एवढी रक्कम वसूल करण्यात आली. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात आजपर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून 800 किलो प्लास्टिक व थर्माकोल जप्त करण्यात आले असून दंडापोटी रु.1,35,000 एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

Under plastic ban action Thane municipality collected fine of Rs 1.35000

प्लास्टीकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाऱ्या असून पर्यावरणास हानीकारक आहेत. या वस्तुची विक्री आणि वापर दोन्ही बेकायदा आहे. त्याचा वापर करताना पहिल्यांदा आढळल्यास रु.5000 दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास रु.10,000 दंड आणि तिसऱ्यांदा आढळल्यास रु. 25000 व 3 महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

हेही वाचा - वेध विधानसभेचे : जळगाव शहर मतदारसंघ; युतीच्या तहात जागा भाजपला की सेनेला...मतदारांमध्ये उत्सुकता

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांद्वारे विविध सार्वजनिक मंडळाद्वारे सजावटीचे सादरीकरण करण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या प्लास्टीक व थर्माकोल बंदीची अंमलबजावणी ठाणे शहरात होण्याकरता नागरिक, सार्वजनिक मंडळे तसेच व्यापाऱ्यांनी महापालिकेला सहकार्य करावे. पर्यावरणस्नेही उत्सव साजरे करुन सजावटीकरता जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करावा. प्लास्टीक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून ठाणे शहर स्वच्छ राखण्याकरता सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत 1 लाख 35 हजार रुपये दंड वसुली तर 888 किलो प्लास्टिक व थर्माकोल जप्तBody:

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात आजपर्यँत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 888 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दंडापोटी 1 लाख 35 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील वस्तुचे ( उत्पादन , वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) याबाबत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर अधिसूचनांच्या अंमलबजावणीकरिता ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिबंधीत प्लास्टीक व थर्माकोल वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक करणाऱ्या संस्था, आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने सन 2018-19 या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण 15,548 किलो प्लस्टिक व थर्माकोल वाहनाद्वारे संकलन करण्यात आले आहे.तर 5049 किलो प्लस्टिक व थर्माकोल आस्थापनाधारकांकडून जप्त करण्यात आले असून दंडापोटी रु.9,40,200 एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात आजपर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून 800 किलो प्लास्टिक व थर्माकोल जप्त करण्यात आले असून दंडापोटी रु.1,35,000 एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

प्लास्टीकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाऱ्या असून पर्यावरणास हानीकारक आहेत. या वस्तुची विक्री आणि वापर दोन्ही बेकायदा असून त्याचा वापर करताना पहिल्यांदा आढळल्यास रु.5000 /- दंड,दुसऱ्यांदा आढळल्यास रु.10,000 /- दंड आणि तिसऱ्यांदा आढळल्यास रु. 25000/- व 3 महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांद्वारे तसेच विविध सार्वजनिक मंडळाद्वारे सजावटीचे सादरीकरण करण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या प्लास्टीक व थर्माकोल बंदीची अंमलबजावणी ठाणे शहरात होण्याकरिता नागरिक, सार्वजनिक मंडळे तसेच व्यापाऱ्यांनी महापालिकेला सहकार्य करावे. पर्यावरणस्नेही उत्सव साजरे करुन सजावटीकरिता जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तुचा वापर करावा. प्लास्टीक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून ठाणे शहर स्वच्छ राखण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.