ETV Bharat / city

युवक काँग्रेसच्या वतीने "एकच लक्ष मोदी सरकार विरुद्ध एक कोटी साक्ष" - solapur latest news

"एकच लक्ष मोदी सरकार विरुद्ध एक कोटी साक्ष" ही राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेस स्वाक्षरी मोहीम
काँग्रेस स्वाक्षरी मोहीम
author img

By

Published : Jul 14, 2021, 4:49 PM IST

Updated : Jul 14, 2021, 5:03 PM IST

सोलापूर - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस(Maharashtra Pradesh Youth Congress)तर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी(fuel price hike)च्या तसेच महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे(praniti shinde), महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली "एकच लक्ष मोदी सरकार विरुद्ध एक कोटी साक्ष" ही राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ आज सोलापुरातील नवल पेट्रोल पंप येथे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार यांच्या हस्ते करण्यात आला.

युवक काँग्रेस घेणार दोन लाख सह्या

शहर काँग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकार देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत आहे. पेट्रोल-डिझेल बरोबरच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेचे जीवन असहाय्य झाले आहे. याविरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसने स्वाक्षरी मोहीम आयोजित केली आहे. त्याअंतर्गत सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने दोन लाख सह्या गोळा करण्यात येऊन प्रदेश युवक काँग्रेसच्या एकच लक्ष मोदी सरकार विरुद्ध एक कोटी साक्षअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरुद्ध जनतेचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार असून ताबडतोब दरवाढ कमी करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

दोन लाख सह्या घेण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद दादा भोसले, युवक कार्याध्यक्ष युवराज जाधव, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, तिरूपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, दाऊद नदाफ, प्रतिक अबुटे, विवेक इंगळे ,शाहू सलगर, महेश लोंढे, संजय गायकवाड, अभिषेक गायकवाड, आशुतोष वाले, भीमा पेदे, भगवान करगुळे, मोनेश घंटे, धम्मा झगझाप, विनायक भंडारे, भीमा बज्जर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Jul 14, 2021, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.