पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर लोकांची मानसिकता दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे आपल्याला अनेक प्रकारातून पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच एक प्रकार हडपसर भागातून समोर आला आहे. मुलीला श्वान चावल्याच्या रागातून मुलीच्या आईने श्वानाच्या दोन पिलांना काठीने मारून ठार केल्याचा प्रकारसमोर ( woman killed dogs pup in Pune ) आला आहे. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी आता हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता दिलीप खाटपे असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत नीता आनंद बीडलान यांनी तक्रार दिली आहे.
दोन श्वानाच्या पिल्ल्यांना मारले - अनिता खाटपे यांच्या लहान मुलीला काही दिवसांपूर्वी हडपसर येथील एका उच्छभु सोसायटीत कुत्रा चावला होता. याचाच राग त्यांच्या मनात होता. त्यामुळे ही महिला श्वानांना मारण्यासाठी सोसायटीत काठी घेऊन फिरत होती. ही महिला सोसायटीतील एकही श्वान जीवंत ठेवणार नाही, असे म्हणून हातात मोठी काठी घेऊनच सोसायटीत फिरत होती. यात त्या महिलेने श्वानांच्या दोन पिलांना मारून ठार केले. अनिता हातात काठी घेऊन फिरत असताना त्या अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. श्वानाच्या दोन लहान पिलांना या महिलेने मारल्याचे लक्षात आल्यानंतर सोसायटीतच राहणाऱ्या अन्य एका महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - Monkey Attack Dog In Beed : बीडमध्ये वानरांचा धुमाकूळ, एका महिन्यात सव्वाशेहून अधिक श्वानांचा घेतला बळी