ETV Bharat / city

Recycled Plastic Project In Pune : पुण्यात टाकाऊ प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तू, 'रिचरखा'चा अनोखा प्रकल्प - टाकाऊ प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तू

प्लास्टिक वापरणे किती धोक्याचे आहे, हे आपण अनेकवेळा पाहत असतो. मात्र, पुण्यात फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करुन आकर्षक अशा टिकाऊ वस्तू बनवल्या ( Recycled Plastic Project In Pune ) आहेत. त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे.

Recycled Plastic Project In Pune
Recycled Plastic Project In Pune
author img

By

Published : Feb 13, 2022, 1:48 PM IST

पुणे - प्लास्टिक वापरणे किती धोक्याचे आहे, हे आपण अनेकवेळा पाहत असतो. बंदी असताना देखील प्लास्टिकचा वापर केला जात आहे. अशा वेळी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर वाया जाते आणि वेस्टही होते. मात्र, या वेस्ट प्लास्टिकचा काय उपयोग करता येऊ शकतो, याचा विचार करून पुण्यात राहणाऱ्या एका महिलेने एक भन्नाट कल्पना तयार केली आहे. पुण्याच्या अमिता देशपांडे यांनी फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करुन आकर्षक अशा टिकाऊ वस्तू बनवल्या ( Recycled Plastic Project In Pune ) आहेत. त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी देखील चांगली आहे.

'रि चरखा'च्या माध्यमातून टाकाऊ पासून टिकाऊ

अमिता देशपांडे या वर्षापासून 'रि चरखा'नावाच्या सोशल इंटरप्रायजेसच्या माध्यमातून टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू बनवत आहेत. कॉलेजच्या काळात अमिता गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करत असताना मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा पडलेला ते पाहत. त्या कचऱ्याचे काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांना नेहमी येत असे. त्यानंतर त्यांनी रि चरखाच्या माध्यमातून प्लास्टिक विकत घेण्यास सुरुवात केली. नागरिक स्वत:हून त्यांना प्लास्टिक देऊ लागले. त्यापासून ते पर्स, बॅग्स, हँडबॅग, लपटॉप बॅग्स, मुलांसाठी पझल गेम आदी वेगवेगळे वस्तू बनवू लागले. याला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अमिता देशपांडे यांच्याशी संवाद साधताना

महिलांना रोजगार मिळण्यासाठी...

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली येथे या सर्व वेस्ट प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाते. हातमाग आणि चरखा या दोन गोष्टींचा उपयोग केला जात आहे. याठिकाणी हातामागवर तयार करून ते पुढील प्रक्रियेसाठी पुण्यातील शॉपमध्ये आणून त्यापासून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली जाते. हे कश्यासाठी तर महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हा देखील यामागील मुख्य उद्देश असल्याचे अमिता देशपांडे सांगतात. दोन्ही वर्कशॉप मिळून एकूण 37 महिला कामाला असून त्यात 80 टक्के महिलांचा समावेश आहे.

हेही वाचा - Pune Municipal Corporation case : गोंधळ भोवला, भाजपच्या शहराध्यक्षासह ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.