पुणे - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या बेरोजगार झालेल्यांचा टक्का मोठा आहे. याची झळ विवाह सोहळ्यात बॅन्ड वाजवून वऱ्हाडी मंडळींना ठेका धरायला नावणाऱ्या वाजंत्र्यांना (बॅन्ड वादक) देखील बसलीय. सध्या त्यांच्यावर मिळेल ते काम करण्याची वेळ आली असून 40 वर्षांची अखंड चालणारी परंपरा यावर्षी मात्र खंडित झाली आहे.
लॉकडाउनमुळे वाजंत्र्यांचा व्यवसाय ठप्प दुर्गेश भानुदास खाडे असे बॅन्ड वादन करणाऱ्या कंपनीच्या मालकाचे नाव असून अशीच काहीशी वेळ भीमराव सीताराम पवार यांच्यावर आली आहे. बेरोजगार झाल्याने दुर्गेश हे भाजी आणि फळ विक्री चा व्यवसाय करत असून भीमराव यांच्यावर बिगारी काम करण्याची वेळ आली आहे.
यावर्षी विवाह सोहळ्याचा हंगाम जोमात करण्यासाठी भीमराव आणि दुर्गेश यांनी नवीन मोटारी घेतल्या. त्या मोटारी विवाह सोहळ्यात वाजंत्री मंडळींना घेऊन जाण्यासाठी तसेच बॅन्ड वाजवण्यास रंगकाम करून तयार ठेवल्या होत्या. मात् कोरोनामुळे संचारबंदीचा निर्णय झाला. सार्वजनिक विवाह सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली. याचा थेट परिणाम वाजंत्र्यांच्या व्यवसायावर झाला. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्याच मोटारीत भाजी आणि फळ विक्री करण्याची वेळ आली आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आता धूळखात पडलेल्या मोटारी देखील त्यांनी भाजी व्यवसायासाठी वापरात काढल्या आहेत. अनेकांवर मोटारीचे कर्ज असून ते परत कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
लॉकडाउनमुळे वाजंत्र्यांवर आली फळभाज्या विकण्याची वेळ दुर्गामाता बॅन्डचा व्यवसाय गेल्या 40 वर्षांपासून करत असल्याचे व्यवसाय मालक दुर्गेश भानुदास खाडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.ज्या वेळेस विवाह सोहळा किंवा इतर कार्यक्रम असतात तेव्हा विविध शहरांतून कारागीर मागवले जातात. यामुळे त्यांनाही रोजगार मिळायचा. पण आता आमचाच व्यवसाय ठप्प झाला आहे. आम्ही बेरोजगार झालो आहोत. त्यामुळे भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय. एकेकाळी ज्या मोटारीत बॅन्ड वाजवला जात होता, त्याच मोटारीतून भाजी विकण्याची वेळ आली आहे. तसेच कलाकार वाहतुकीसाठी घेतलेली गाडीत फळविक्रीसाठी वापरण्यात येत आहे. बॅन्ड मालकांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
वाजंत्री व्यवसायाला लागले कोरोना ग्रहण तर भीमराव सीताराम पवार यांचा मागील 25 वर्षांपासून बॅन्ड व्यवसाय आहे. मागील 25 वर्षाची परंपरा असून हाच व्यवसाय करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहे. कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यांनी पोटाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी इतर काम सुरू केलं आहे. पेंटिंग काम, बिगारी काम, करत करत आहेत. विवाह सोहळे होत असले तरीही आम्हाला सुपारी नसते, असे ते म्हणाले. लग्नमुहूर्त तोंडावर असल्यामुळे नवीन वाहन घेतले. आता त्यांचे हप्ते कसे भरायचे, असा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. यावर्षीचा हंगाम असाच गेलाय. मालक असून बिगारी काम करण्याची वेळ आली आहे, असे भीमराव पवार यांनी सांगितले.