आळंदी/पुणे - कामिका एकादशीनिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. विना मंडपात व समाधी मंदिरात (गाभाऱ्यात) विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आले आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक एकादशी निमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच ऑनलाइन दर्शन घ्यावं लागत आहे. देवस्थानं बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, फुलांची आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू असल्याची माहिती देवस्थानचे व्यस्थापक माऊली वीर यांनी दिली आहे.
कामिका एकादशी व्रत आणि उपासना पद्धतकामिका एकादशीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून, स्वच्छ कपडे घातले जातात. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूचे ध्यान केल्यावर कामिका एकादशीला नवस करुन पूजा करावी. यानंतर अखंड, चंदन, फुले, धूप, दिवे इत्यादींनी भगवान विष्णूची पूजा करावी. फळे आणि मिठाई अर्पित करावे. विष्णूला लोणी-साखरेचा नवैद्य दाखवावा व तुळशीचे पान अर्पित करावे. तसेच देवी लक्ष्मीची पूजा करावी. यानंतर, कामिका एकादशीची कथा ऐकावी. पूजेच्या शेवटी भगवान श्री विष्णूची आरती करा. त्यानंतर दिवसभर फलाहार करून देवाची वंदना करावी. संध्याकाळची आरती करावी. दुसर्या दिवशी ब्राह्मणाला देवाला अर्पण केलेल्या वस्तू दान करा. यानंतर पारायण करून उपवास पूर्ण करावा.कामिका एकादशीचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृषष्णाने धर्मराज युधिष्ठिरास सांगितली होती. याआधी वशिष्ठ मुनींनी दिलीप राजास सांगितली होती. ही कथा ऐकून त्यांना पापांपासून मुक्ती मिळाली आणि मोक्ष प्राप्ती झाली. कामिका एकादशीचे व्रत मनोभावे आचरल्यास ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तता होते, असे मानले जाते. आषाढ महिन्याच्या वद्य पक्षात येणाऱ्या कामिका एकादशीनंतर व्रत-वैकल्यांचा, सण-उत्सवांचा श्रावण मास सुरू होतो. त्यामुळे या कामिका एकादशीला अधिक महत्त्व प्राप्त होते, असे पुराणात सांगितले जाते.